एक कोटीच्या ‘सुपारी किलिंग’ प्रकरणात ‘एमएसएमई’चा संचालक; धक्कादायक माहितीने खळबळ
नागपूर शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा हिट एण्ट रन केसमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना हा अपघात नसून सुपारी देऊन सुनेने सासऱ्याला संपविल्याचे उघडकीस आले आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार या ‘हिट एण्ड रन’ सुपारी किलिंग प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. नागपुरात एका सुनेने सासऱ्याची कोट्यवधीची संपत्ती लाटण्यासाठी त्याची सुपारी देऊन अपघात भासवून हत्या केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे ( MSME ) संचालक प्रशांत पार्लेवार यांनाही अटक झाली आहे. नागपूर शहराच्या बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा अपघात नव्हे तर सुपारी देऊन संपविल्याचे उघडकीस आले होते.
एकूण सहा आरोपींचा सहभाग
या हत्या प्रकरणात सून अर्चना हीचा भाऊ प्रशांत देखील सहभागी असल्याचे उघडकीस आले होते. प्रशांत याने सार्थक आणि अन्य आरोपीच्या मदतीने हा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. अर्चनाची पर्सलन सेक्रेटरी पायल नागेश्वर हीचा देखील या हत्येत सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीसांना एकूण सहा आरोपींना बेड्या घातल्या आहेत असे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपूरात कोट्यवधीची संपत्ती आहे. त्यांच्या मुलांचा संपत्ती वाटपावरुन न्यायालयात वाद सुरु होता. पुरुषोत्तम आपली सारी संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील या भीतीने सून अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्यांचा काटा काढल्याचे म्हटले जात आहे.
नागपूरात हिट अँड रनमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. नागपूर शहरातील बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका कारने मागून बेदरकारपणे ज्येष्ठ नागरिकाला उडविले होते. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून 40 फूटापर्यंत कारने वृद्धाला फरफटत नेल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिस तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जाणूनबूजून अपघातात मारल्याचे उघडकीस आले.
काय आहे प्रकरण
नागपुरात पुरुषोत्तम पुट्टेवार यांची 20 ते 22 कोटीची संपत्ती आहे. या संपत्तीच्या वाटणीवरुन कोर्टात केस सुरु होती. सासऱ्याने त्यांच्या दुसऱ्या मुलांना देऊ नये यासाठी सुनेने सासऱ्यांच्या हत्येची 1 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या एक कोटी सोबतच बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचे देखील होते आमिष दाखविण्यात आले होते. आरोपींना त्यासाठी 17 लाख रुपये ऍडव्हान्स देण्यात आले होते. आरोपी सून अर्चना या गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकर आहेत. सध्या या प्रकरणात अर्चना जेलमध्ये असून तीन आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणातील अर्चना हीचा भाऊ प्रशांत पार्लेवार या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. प्रशांत स्वत: गडचिरोली नगर विकास सहायक संचालक आहे. अर्चना पुट्टेवार . याप्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या रडावर असून त्यांनाही लवकर अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.