चपलांचा हार घातला, मग केले घृणास्पद कृत्य; लिव्ह इन मध्ये राहण्याची तरुणाला भयंकर शिक्षा
तोडराय सिंगच्या लांबाहृसिंह मुंडियाकला भागात एक प्रेमी युगल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे कुटुंबीय तिला परत घरी घेऊन आले.
टोंक : मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता म्हणून एका तरुणासह त्याच्या बहिणीला मुलीच्या कुटुंबीयांनी तालिबानी शिक्षा दिल्याची संतापजनक घटना राजस्थानमधील टोंकमध्ये घडली आहे. याप्रकरणी आठ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वडील नवरत्न, आई गीता, भाऊ सावित्री, भाऊ शंकर, मुलीचा मेहुणा, भोपलाव रहिवासी पारस, हेमराज, संत्रा, गोवर्धन मोग्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पारस, शंकर आणि हेमराज यांना अटक करण्यात आली आहे.
प्रेमी युगुल लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचे
तोडराय सिंगच्या लांबाहृसिंह मुंडियाकला भागात एक प्रेमी युगल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे कुटुंबीय तिला परत घरी घेऊन आले.
पंचांच्या निर्णयानंतर मुलीच्या कुटुंबीयांचे तरुणासोबत तालिबानी कृत्य
यानंतर सोमवारी याप्रकरणी भोपाळो मंदिराबाहेर मोग्या समाजाच्या पंचांची पंचायत झाली. यामध्ये तरुणालाही बोलावण्यात आले होते. तरुण आपल्या बहिणीसह तेथे पोहोचला होता.
पंचायतीत पंच-पटेलांनी 5 दिवसांचा अवधी देत मुलीच्या वडिलांना 93 हजार रुपये देण्याचा आणि त्यानंतर मुलीला घेऊन आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आपला निकाल दिल्यानंतर पंच तेथून निघून गेले.
रात्रभर ओलीस ठेवले मग…
पंचायत झाल्यानंतर दोघे भाऊ-बहीण आपल्या गावी जाण्यासाठी बस स्टँडकडे चालले होते. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही उचलून जंगलात नेले आणि तेथे दोघांना रात्रभर ओलीस ठेवले.
मुलीचे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाहीत. यानंतर त्यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला आणि त्याच्या बहिणीला चपला घालून लघवी पाजली. त्यानंतर गरम चिमट्याने चटके दिले.
आठ जणांवर गुन्हा दाखल
एवढेच नाही तर नाकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.