वांद्रे परिसरात दोन गटात तुफान राडा, तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण; 7 जण गंभीर जखमी, एकाला अटक
वांद्रे पश्चिम भागातील जेजे कॉलनी परिसरात एका कट्ट्यावर 8 ते 10 जण बसले होते. त्यावेळी अचानक बाईकवरुन 20 ते 25 लोकांची टोळी आहे. त्यांनी बसलेल्या लोकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई : मुंबईत वांद्रे पश्चिम भागात रात्री साडे दहाच्या सुमारास दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. 8 ते 10 लोकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जवळच्याच भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. (Dispute between two groups in Bandra West area, 7 seriously injured)
नेमकं काय घडलं?
मुंबईतच्या वांद्रे पश्चिम भागातील जेजे कॉलनी परिसरात एका कट्ट्यावर 8 ते 10 जण बसले होते. त्यावेळी अचानक बाईकवरुन 20 ते 25 लोकांची टोळी आहे. त्यांनी बसलेल्या लोकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळच्याच भागा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन दोन तासात एका आरोपीला अटक केलीय. त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, तलवार आणि लोखंडी रॉडसारख्या शस्त्राने हा जीवघेणा हल्ला का करण्यात आला? याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ल्याच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
वर्दळीत चिकन दुकानदाराचा कोयत्याने दोघांवर हल्ला
वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे शेजारील चिकनच्या दुकानदारानेच हा हल्ला केला आहे. या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर दुकानदार हल्ला करुन फरार झाला आहे. जखमी भावांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
चिकन दुकानदाराने हल्ला का केला?
वडाळा नाका येथे हल्लेखोरांचं चिकनचं दुकान आहे. या दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या दोघा भावांनी चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसात केली होती. याच गोष्टीच्या रागातून चिकन दुकानदाराने दुकानात असलेल्या कोयत्याने दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमीर खान आणि मझर खान हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गजबजलेला रस्ता, भर वर्दळमध्ये चिकन दुकानदाराचा कोयत्याने दोघांवर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद #nashikcrime #crime #crimenews pic.twitter.com/atxhJhV4sD
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 26, 2021
संबंधित बातम्या :
वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह
Road Rage Video | कारला कट बसल्याचा राग, वसईत बॅटने स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण
Dispute between two groups in Bandra West area, 7 seriously injured