एकाच ठिकाणी स्टॉल लावण्यावरुन फेरीवाला महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले, अखेर पोलिसांनी ‘असा’ सोडवला वाद

इतकेच नव्हे एका ठिकाणी दोन स्टॉल लावण्याने फेरीवाले महिला आणि पुरुष दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. तब्बल अर्धा तास हा वाद सुरू होता. नंतर याचं रूपांतर हाणामारीत झाले.

एकाच ठिकाणी स्टॉल लावण्यावरुन फेरीवाला महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले, अखेर पोलिसांनी 'असा' सोडवला वाद
भररस्त्यात हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 2:00 PM

मुरबाड : म्हसा यात्रेत स्टॉल लावण्यावरून पहिल्याच दिवशी फेरीवाल्यांत हाणामारी झाल्याची घटना मुरबाडमध्ये घडली आहे. एका ठिकाणी दोन स्टॉल लावण्यामुळे फेरीवाला महिला गट आणि पुरुष गट आपापसात भिडले. तब्बल अर्धा तास हा वाद सुरू होता. अर्ध्या तासानंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. अखेर ही हाणामारी सोडवण्यासाठी पोलिसांनी वादात उडी घेतली. पोलीस समजूत काढत असूनही वाद मिटत नसल्याने पोलिसांनी दांडक्याचा प्रसाद देत वाद सोडवला.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी यात्रा

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि 222 वर्ष जुनी असणारी मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या म्हसा गावातील म्हसोबाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. या यात्रेला राज्यभरातील यात्रेकरू मोठ्या प्रमाणात येत असतात.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे ही जत्रा बंद होती. त्यासोबतच यावर्षी जनावरांवरील होणार्‍या लम्पी रोगामुळे जनावरांचा बाजार होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, पशुसंवर्धन मंत्र्यांनी यात्रा भरविण्याची विनंती मान्य केल्याने कालपासून ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

गेल्या 15 दिवसांपासून फेरीवाले जागा पडकडून आहेत

या यात्रेत जत्रेसाठी मोठ्या फेरीवाले विक्रेते व्यवसायासाठी आले असून, गेल्या 15 दिवसापासूनच आपला स्टॉल लावण्यासाठी या फेरीवाल्यांनी मंदिर परिसराची जागा पकडून ठेवली आहे.

यात्रा सुरु होताच दुकान मांडण्यावरुन फेरीवाल्यांमध्ये वाद

यात्रा सुरू होताच दुकान मांडण्यासाठी आता या फेरीवाल्यांत वाद सुरू झाला. शुक्रवारी सायंकाळी यात्रेच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात स्टॉल लावण्यावरून या फेरीवाला-विक्रेत्यांमध्ये आपापसात जुंपलेली पाहायला मिळाली.

काही वेळाने वादाचे हाणामारीत रुपांतर

इतकेच नव्हे एका ठिकाणी दोन स्टॉल लावण्याने फेरीवाले महिला आणि पुरुष दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. तब्बल अर्धा तास हा वाद सुरू होता. नंतर याचं रूपांतर हाणामारीत झाले.

विशेष म्हणजे पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही वाद मिटत नसल्याने अखेर पोलिसांना हा वाद सोडवण्यासाठी या फेरीवाल्यांना दांडक्याचा प्रसाद द्यावा लागला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.