Beed Doctor Beaten : डॉक्टर दाम्पत्याला धक्काबुक्की करत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

परळी शहरातील विद्यानगर भागात राहणारे डॉक्टर शिवकांत अंदुरे यांचे नाथ रोडवरील भागवत मंगल कार्यालय शेजारी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. काही वर्षांपूर्वी अंदुरे यांनी जीवन फडकरी यांच्याकडून भिशीमार्फत सात लाख वीस हजार रुपये घेतले होते.

Beed Doctor Beaten : डॉक्टर दाम्पत्याला धक्काबुक्की करत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
परळीत पैशाच्या वादातून डॉक्टर दाम्पत्याला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 6:27 PM

बीड : भिशीच्या पैशाच्या वादातून परळीमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याला त्यांच्या हॉस्पिटसमोरच मारहाण आणि धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी यावेळी डॉक्टरच्या पत्नीचा विनयभंगही केला. परळी येथील नामांकित डॉक्टर दाम्पत्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि डॉक्टरांच्या तक्रारीवरून परळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या ओळखीच्याच व्यक्तींकडून आणि भाडोत्री लोकांकडून ही मारहाण झाल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे. मारहाणीत डॉक्टरांचे दात पडले आहेत.

डॉक्टर दाम्पत्याने 7 लाख 20 हजार भिशीमार्फत घेतले होते

परळी शहरातील विद्यानगर भागात राहणारे डॉक्टर शिवकांत अंदुरे यांचे नाथ रोडवरील भागवत मंगल कार्यालय शेजारी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. काही वर्षांपूर्वी अंदुरे यांनी जीवन फडकरी यांच्याकडून भिशीमार्फत सात लाख वीस हजार रुपये घेतले होते.

मात्र फडकरी याने याचे चक्री व्याजदर करत एक कोटी 26 लाख रुपये लावत अंदुरे यांना मानसिक त्रास द्यायला सुरू केले होते. तसेच त्यांच्या हॉस्पिटलवर कब्जा देखील केला होता. मात्र दोन आठवड्यापूर्वी अंदुरे यांनी आपले हॉस्पिटल ताब्यात घेत परत एकदा सुरू केले होते.

हे सुद्धा वाचा

पैशाच्या वादातून हॉस्पिटलसमोर डॉक्टर दाम्पत्याला मारहाण

मात्र 20 जानेवारी रोजी 11 ते 12 च्या दरम्यान जीवन फडकरी आणि अभय बळवंत हे इतर भाडोत्री गुंड महिला यांनी अंदुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये शिरत त्यांना आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच हॉस्पिटलच्या बाहेर वंदना अंदुरे आणि शिवकांत अंदुरे यांना जमावासमोर मारहाण करत वंदना अंदुरे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलसमोर उपस्थित झालेल्या जमावामुळे वंदना यांचे अपहरण जीवन फडकरी आणि त्यांच्या साथीदारांना करता आले नाही. तसेच फडकरी यांनी डॉ. शिवकांत अंदुरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांचे दात पाडले.

परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात वंदना शिवकांत अंदुरे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास परळी शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.