वेतनवाढ मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे डॉक्टरची शरीरसुखाची मागणी, कुठे घडली धक्कादायक घटना?

कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली असून, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई सुरु केली आहे.

वेतनवाढ मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे डॉक्टरची शरीरसुखाची मागणी, कुठे घडली धक्कादायक घटना?
कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:49 PM

कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पगारवाढीची मागणी करणाऱ्या एका महिला कर्मचारीकडे डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी येथील पल्स रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. डॉ. देवेंद्र धोपटे याच्याविरोधात एका विवाहित महिला कर्मचारीने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेसोबत काय घडले?

पीडित महिला सदर रुग्णालयात गेली अडीच वर्षे रुग्णांची देयके तयार करण्याची कामे करते. अडीच वर्षापासून त्याच पगारात काम करत असल्याने महिला बुधवारी दुपारी डॉ. देवेंद्र धोपटे याच्या दालनात गेली. महिलेने धोपटेकडे वेतनवाढ करण्याची मागणी केली. यावेळी डॉक्टरने तिच्याशी अश्लील भाषेत बोलणं सुरु केलं.

तुला मी यापूर्वी काय बोललो होतो त्याची आठवण कर. वेतनश्रेणी वाढवली तर तू मला काय देशील, अशी विचारणा महिलेकडे केली. महिला कर्मचाऱ्याने त्याला असल्या चावट बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय या महिलेच्या शरीरयष्टीवरही डॉक्टरने अश्लील भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे भाष्य केल्याने संबंधित महिला कर्मचारी व्यथित झाली. मग तिने थेट खडकपाडा पोलीस ठाणे गाठले आणि स्त्रीलंपट डॉक्टरच्या विरुध्द तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.