नाशिक : नाशिक (nashik) शहरात बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंबड (ambad) येथील एका डॉक्टरने अल्पवयीन परिचारिकेवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. त्यानुसार नाशिकच्या अंबड पोलीसात पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा (crime) दाखल केला आहे. या घटनेने नाशिक शहर हादरून गेले असून आरोपीचे नाव डॉ. उल्हास कुटे (Doctar) असे आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह वैद्यकीय क्षेत्रात या घटणेचीच मोठी चर्चा आहे.
संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पिडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असतांना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
अत्याचार केल्या नंतर संशयित आरोपी कुटे याने पीडित तरुणीला धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील अशी धमकी वजा सूचना केली. मात्र, तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने ही बाब थेट पोलिसांत सांगितली. अंबड पोलिसांनी या घटनेची दखल गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेचे तक्रारीनुसार बलात्कार, पीडित अल्पवयीन आणि अनुसूचित प्रवर्गातील असल्याने त्यानुसार पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहेल शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या करीत असून संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याला अंबड पोलीसांनी अटक केली आहे. बलात्कार, पोस्को आणि ॲट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.