उल्हासनगर – अनेकदा माणसं प्राण्यांच्याबाबत एकदम क्रुर का वागतात असा प्रश्न पडतो. कारण प्राण्यांना (animal) मुद्दाम त्रास देणं, मारहाण करण असे प्रकार आता मोबाईलच्या (Mobile) माध्यमातून सर्रास पाहायला मिळतात. तसेच अनेक नागरिकांवरती कारवाई देखील झाली आहे. उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) अशीचं एक घटना घडली आहे. त्यामध्ये एक कुत्री दारातल्या चप्पला दुसरीकडे घेऊन जाते म्हणून पिता-पुत्राने कुत्रीला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण केल्यानंतर काहीवेळाने कुत्रीचा मृत्यू झाला आहे. त्या कुत्रीला सहा पिल्ल आहेत. आईची हालचाल होत नसल्याने पिल्ली उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीतरी झालंय या शंकेने त्यांची नजर इकडे तिकडे भिरकावत आहेत. आईची हालचाल होत नसल्याने एकदम घट्ट चिटकून बसली होती. त्यावेळी बघ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले.
Police have registered a case against a man and his son for allegedly beating a stray dog to death as it littered a locality in Ulhasnagar township in Maharashtra’s Thane, an official said
हे सुद्धा वाचा— Press Trust of India (@PTI_News) May 30, 2022
कॅम्प नं तीनमध्ये ओटी सेक्शनमध्ये दीपक मोतीरामनी यांच्या घरासमोर ठेवलेली नेहमी चप्पल घेऊन जायची. त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्य प्रचंड वैतागले होते. गुरूवारी त्यांनी पिल्लांच्या आईला बांबूनी जोरदार मारहाण केली. त्यावेळी ती आई अक्षरश: विव्हळत होती. तरीही मोतीरामनी आईला मारहाण केली. त्यावेळी तिथं प्रत्यक्षदर्शी असलेल्या लोकांनी त्यांना कारण विचारले, त्यांनी वारंवार चप्पल घेऊन जात असल्याचे सांगितले. शनिवारी त्यांच्या मुलाने पिल्लाच्या आईला त्याच बांबूने जोरात मारहाण केली. त्यावेळी काही नागरिकांनी मारहाण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली.
निपचित पडलेल्या पिल्लांच्या आईला बेदम मारहाण झाल्याची जागृत नागरिकांना माहिती मिळताचं. त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले. त्यावेळी तिच्यावर उपचार देखील करण्यात आला. पण काही वेळाने आईचा मृत्यू झाला. स्थानिक प्राणी मित्र आशिष सरकार आणि रजनी ठाकून या दोघांनी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस मारहाण केलेल्या पिता-पुत्रा विरोधात काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.