डोंबिवलीच्या तरुणाकडून जयपूरच्या बिझनेसमनची सुपारी, एकतर्फी प्रेमातून गोळीबार

व्यावसायिक आदित्य जैन डोंबिवलीमध्ये सहकुटुंब राहत होते. एकतर्फी प्रेमातून आदित्य आणि त्यांच्या पत्नीला कमलेश शिंदे नावाच्या तरुणाकडून वारंवार त्रास दिला जात होता.

डोंबिवलीच्या तरुणाकडून जयपूरच्या बिझनेसमनची सुपारी, एकतर्फी प्रेमातून गोळीबार
आरोपी कमलेश शिंदे
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 2:14 PM

कल्याण : एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या बिझनेसमन पतीवर गोळीबार केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या जाचाला कंटाळून जैन दाम्पत्य डोंबिवलीहून जयपूरला शिफ्ट झालं होतं. मात्र आरोपी तरुणाने सुपारी देऊन राजस्थानमध्ये आदित्य जैन यांच्यावर गोळीबार करुन घेतल्याचा आरोप आहे. (Dombivali man gives contract to kill Rajasthan Businessman in one sided affair)

तरुणाच्या त्रासाला कंटाळून डोंबिवली सोडली

व्यावसायिक आदित्य जैन हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये सहकुटुंब राहत होते. एकतर्फी प्रेमातून आदित्य आणि त्यांच्या पत्नीला कमलेश शिंदे नावाच्या तरुणाकडून वारंवार त्रास दिला जात होता. या छळाला कंटाळून अखेर आदित्य जैन यांनी कुटुंबासह डोंबिवली सोडली.

सुपारी देऊन व्यावसायिकावर गोळीबार

ठाणे सोडून जैन राजस्थानमधील जयपूर येथील अवधपुरी भागात स्थलांतरित झाले. मात्र कमलेश शिंदेचा जाच थांबला नाही. त्याने दोघा जणांना आदित्य जैन यांना जीवे मारण्याची सुपारी दिली. या दोघा जणांनी आदित्य जैन यांच्यावर जयपूरमधील त्यांच्या राहत्या घरी जाऊन गोळीबार केला. या गोळीबारात आदित्य जैन हे सुदैवाने बचावले.

राजस्थान पोलिसांकडून आरोपीला बेड्या

या प्रकरणाचा उलगडा होताच राजस्थान पोलीस डोंबिवलीला पोहोचली. कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांच्या मदतीने कमलेश शिंदे हा डोंबिवलीमधून पकडला गेला. कमलेशला घेऊन राजस्थान पोलीस पुन्हा जयपूरला रवाना झाली आहे.

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राहणाऱ्या युवतीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर नगर भागात सुवर्णा अर्जुन चव्हाण ही 21 वर्षीय युवती सहकुटुंब राहत होती. गावात राहणारा 25 वर्षीय आरोपी आकाश श्रीराम आडे याचे सुवर्णावर एकतर्फी प्रेम होते. सुवर्णाचे वडील, आई, भाऊ बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून आरोपी आकाश तिच्या घरात शिरला. सुवर्णाच्या पोटात आकाशने चाकू आणि गुप्तीने वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे सुवर्णाच्या घरात रक्ताचा सडा पडला होता. हल्ल्यात सुवर्णाला प्राण गमवावे लागले.

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला, नंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला

(Dombivali man gives contract to kill Rajasthan Businessman in one sided affair)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.