डोंबिवलीतील हातात कोयता घेऊन गुंड टोळीचा धुडगूस, वृध्द जोडप्याला घरात घुसून धमकावले !

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दिवसाढवळ्या गुन्हेगार गुन्हा करत आहेत. गुन्हेगारांची हिंमत पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

डोंबिवलीतील हातात कोयता घेऊन गुंड टोळीचा धुडगूस, वृध्द जोडप्याला घरात घुसून धमकावले !
शेजाऱ्याकडून तरुणीवर अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 3:25 PM

डोंबिवलीत / सुनील जाधव : पुण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतील कोयता फॅड आल्याचे एका घटनेमुळे दिसून आलंय. एका गुंड टोळीने हातात कोयता घेऊन वृध्द दाम्पत्याच्या घरी धुडगूस घातल्याची डोंबिवली देसले पाडा परिसरात घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जितू निशाद आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय. जितू निषाद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात या आधी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दाम्पत्याच्या घरात शिरून, तुमचा मुलगा कुठे आहे, असे विचारत या टोळीने घराच्या दरवाजावर कोयत्याने प्रहार केला. इतकेच नव्हे तर घरात घुसून दमदाटीही केली.

वृद्ध जोडपे घरी एकटे असताना टोळक्याचा हल्ला

डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरात बेबी देसले आणि त्याचे आजारी पती हे आपल्या मुलासह राहतात. शनिवारी बेबी आणि त्यांचे आजारी पती घरात एकटे होते. याच दरम्यान बेबी यांचा मुलगा मनोज याचा पूर्वीचा मित्रा जितू निषाद आणि त्याचे चार साथीदार त्याच्या घराजवळ येवून शिवीगाळ करू लागले. तुमचा मुलगा कुठे आहे असे बोलत त्यांनी हातातील कोयत्याने घराच्या दरवाजावर जोरदार प्रहार केले.

या हल्ल्यामुळे घाबरलेल्या बेबी देसले यांनी मुलगा घरात नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र या टोळीने जबरदस्तीने दरवाजा उघडून घरात घुसून जोरजोरात ओरडून धिंगाणा घातला. याच दरम्यान गोंधळ ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना देखील धमकी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा मारू अशी धमकी जितू आणि त्याच्या साथीदारांनी या वृद्ध दाम्पत्याला दिली.

हे सुद्धा वाचा

मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल

जवळपास अर्धा ते पाऊण तास हा धिंगाणा सुरू होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जितू आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितू आणि दाम्पत्याच्या मुलगा मनोज या दोघांमध्ये जुना वाद आहे. याच वादातून या टोळीने या दाम्पत्याच्या घरात शिरून तुमचा मुलगा कुठे आहे, असे विचारत या टोळीने घराच्या दरवाजावर कोयत्याने प्रहार केला. इतकेच नव्हे तर घरात घुसून दमदाटीही केली. लवकरच जितू आणि त्याच्या साथीदारांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.