Dombivali Crime : खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या, दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दागिने पसार व्हायच्या !

खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या आणि दागिने चोरुन पसार व्हायच्या. अखेर नणंद-भावजयीची ही जोडी पोलिसांच्या जाळ्यात अडकलीच.

Dombivali Crime : खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या, दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दागिने पसार व्हायच्या !
खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या महिलांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 2:30 PM

डोंबिवली / 1 ऑगस्ट 2023 : खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या आणि दुकान मालकांना बोलण्यात गुंतवून दागिने चोरणाऱ्या नणंद भावजयीला बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले आहे. उषाबाई मकाळे आणि निलाबाई डोकळे अशी आरोपी नणंद-भावजयीची नावे आहेत. डोंबिवलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानात दोघींनी अशाच प्रकारे चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. रामनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत या दोघींना बेड्या ठोकल्या. दोघीही मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी असून, सध्या ठाण्यातील खारेगाव परिसरात झोपडी बांधून राहत होत्या. दोघींवर राज्यभरात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.

डोंबिवलीतील एका दुकानात चोरी झाल्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

डोंबिवली पूर्वेला विनायक ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. काही दिवसांपूर्वी या दोघी महिला या दुकानात खरेदीच्या बहाण्याने गेल्या होत्या. त्यानंतर दुकानमालकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांनी दुकानातील दागिने चोरले. यानंतर दुकानातून निघून गेल्या. काही वेळाने दागिने गायब झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्याने आसपासच्या परिसरात पाहिले महिला कुठे दिसल्या नाहीत. दुकानदाराने रामनगर पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलांना अटक

पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत त्याआधारे महिलांची ओळख पटवली. दोघींना अटक केली आहे. दोघींवर राज्यभरात 16 गुन्हे दाखल आहेत. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बलवंत भराडे, पोलीस कर्मचारी सचिन भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.