माहेरी आलेल्या विवाहित महिलेला प्रपोज केले, महिलेने प्रपोज नाकारताच प्रेमाची जागा द्वेषाने घेतली अन्…

तरुणाची जुनी मैत्रीण रस्त्यात भेटली. मैत्रिणीचा विवाह झाला असून, ती माहेरी आली होती. तरुणाने तिला रस्त्यात अडवून प्रपोज केले. पण विवाहित मैत्रिणीने हे प्रपोज नाकारले. मघ भररस्त्यात हाहाकार उडला.

माहेरी आलेल्या विवाहित महिलेला प्रपोज केले, महिलेने प्रपोज नाकारताच प्रेमाची जागा द्वेषाने घेतली अन्...
कर्ज फेडण्यासाठी पिझ्झा शॉपमध्ये चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:58 PM

डोंबिवली / सुनील जाधव : प्रपोज नाकारल्याच्या रागातून तरुणाने विवाहित मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. जिग्नेश जाधव असे फरार आरोपीचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जिग्नेश आणि पीडित महिला यांच्यात आधी मैत्री होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

भररस्त्यात महिलेवर हल्ला केल्याने एकच खळबळ

डोंबिवली पूर्वेतील शांतीनगर येथील जैन मंदिर समोरील रोडवर शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास ही घटना घडली. वाशी येथे राहणारी एक 25 वर्षीय विवाहित महिला डोंबिवलीत आपल्या माहेरी आली होती. शुक्रवारी दुपारी सदर महिला पायी घरी येत असताना जिग्नेश याने तिला रस्त्यावर थांबवले. यानंतर ‘तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्यासोबत ये’, असे सांगितले. सदर महिलेने त्यास नकार दिला. या नकाराचा राग आल्याने जिग्नेश याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने महिलेवर हल्ला करत गंभीर जखमी केले. यानंतर जिग्नेश याने घटनास्थळावरून पळ काढला.

महिलेवर कळवा येथे रुग्णालयात उपचार सुरु

जखमी महिला रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. त्यानंतर तिच्या भावाने तिला उपचारासाठी डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.