धक्कादायक ! मित्रांनीच आधी गुंगीचे औषध दिले, मग अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले

डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता.

धक्कादायक ! मित्रांनीच आधी गुंगीचे औषध दिले, मग अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले
तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 6:16 PM

डोंबिवली : सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचे औषध पाजून तरुणाचा एका तरुणीसोबत अश्लील व्हिडिओ बनवून 30 लाख रुपयांचे सोने उकळणाऱ्या मित्राला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सागर राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला कोल्हापूरहून अटक केली आहे.

पाडित तरुण कोल्हापूरला इंजिनियरिंगचे शिक्षण घेतो

डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता.

मित्रांनी गुंगीचे औषध पाजून अश्लील व्हिडिओ बनवला

तेथे पिडीत तरुणाच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगींचे औषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याचे धमकावले. पीडीत तरुणाला सातत्याने धमकावत त्याच्याकडून 30 लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले.

हे सुद्धा वाचा

अखेर तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दिली

अखेर ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या तरुणाने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सागर राजूपतला कोल्हापूरहून अटक केली आहे. तो कोल्हापूर येथील इचलकरंजी येथील रहिवासी आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

या प्रकरणात आणखीन किती जणं सहभागी आहेत. त्यात त्यांचा काय सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे. तपासासाठी टिळकनगर पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.

अटक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपींच्या जबाबात तफावत येत असल्याने पोलीस अन्य बाजूने या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.