‘त्या’ आल्या की चोरी झालीच समजा, बोलण्यात गुंतवून ठेवणाऱ्या तिघींना बेड्या

कोणत्याही दुकानात घुसून दुकानदारांना आपल्या बोलण्यात गुंतवून चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आलं आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

'त्या' आल्या की चोरी झालीच समजा, बोलण्यात गुंतवून ठेवणाऱ्या तिघींना बेड्या
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 10:15 PM

ठाणे : कोणत्याही दुकानात घुसून दुकानदारांना आपल्या बोलण्यात गुंतवून चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आलं आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्राची जाधव, छाया जाधव आणि रेश्मा जाधव असे या तिघींची नावे आहेत. (Dombivali police arrested Three women who tried to steal TV from electronic shop)

बोलण्यामध्ये गुंतवायच्या अन् चोरी करायच्या

मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तीन महिला अंबरनाथला राहतात. त्या अंबरनाथ, डोंबिवली या परिसरातील दुकानांमध्ये घुसायच्या. तसेच दुकानात घुसून दुकानदाराला आपल्या बोलण्यामध्ये गुंतवायच्या. असाच प्रकार त्यांनी डोंबिवलीच्या एका दुकानात करण्याचा प्रयत्न केला. दुकानात घुसून त्यांनी गीझर खरेदी करण्याचे नाटक केले. यावेळी गीझरची किंमत काय ? त्याचे वैशिष्य काय ? अशा प्रकराचे प्रश्न विचारत दुकानाच्या मालकाला गुंतवून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर बोलत असताना योग्य संधी साधत या महिलांनी दुकानातील 32 इंची टीव्ही चोरला. नंतर लगेचच मोठ्या शिताफीने त्या दुकानाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या.

टीव्ही चोरण्याचा प्रयत्न केला अन् बिंग फुटले

मात्र, एवढा मोठा टीव्ही चोरून नेताना दुकानदाराची नजर या तीन महिलांवर पडली. त्यांच्या चोरीचे बिंग फुटले. नंतर लगेचच दुकानादाराने या महिलांना पकडून  पोलिसांना पाचारण केले.

याआधीही अशा प्रकारची चोरी केल्याची कबुली

दरम्यान, पोलिसांनी या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या महिलांची चौकशी करत आहेत. आतापर्यंत केलेल्या चौकशीमध्ये या महिलांनी याआधीही अनेक ठिकाणी अशा प्रकारची चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलीस या महिलांची अजूनही सखोल चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

रेल्वे स्टेशनवर सहा महिन्यांच्या बाळाची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारावर टोळी गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

VIDEO: मुंबईत मुलीने धोका दिल्याचं सांगत डोक्याला बंदुक लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

(Dombivali police arrested Three women who tried to steal TV from electronic shop)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.