डोंबिवलीत हायप्रोफाईल सोसायटीत राडा, पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल मालकाला सुरक्षा रक्षकाची बेदम मारहाण

सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवली खोणी पलावा येथील हायप्रोफाईल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ऑर्डर केलेले जेवण पार्सल देण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाला तेथील सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे

डोंबिवलीत हायप्रोफाईल सोसायटीत राडा, पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल मालकाला सुरक्षा रक्षकाची बेदम मारहाण
डोंबविलीत मोबाईलमुळे महाभारत घडले
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 9:29 PM

सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवली खोणी पलावा येथील हायप्रोफाईल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ऑर्डर केलेले जेवण पार्सल देण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाला तेथील सुरक्षा रक्षकाने त्या इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर झालेल्या वादात सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्याला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात आले आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलेने जेवण ऑर्डर केले होते, तिने त्या सुरक्षारक्षकांना समजवाण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी त्या इसमाला खूप मारहाण केली. या प्रकरणी पीडित हॉटेल मालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणारा सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं ?

डोंबिवली मध्ये पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे . पलावापासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे थालीवाली ढाबा नावाचे हॉटेल आहे. अभिषेक जोशी देखील याच पलावा सोसायटीमधील एका इमारतीमध्ये राहतात . काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पलावामधील एका इमारती मधून जेवणाच्या पार्सल ऑर्डरसाठी फोन आला. अभिषेक हे जेवणाचे पार्सल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसह या संबंधित इमारतीमध्ये आले. मात्र तेथे सुरक्षारक्षकाने त्यांना एंट्री करण्यास सांगितले.

अभिषेक यांनी आपल्या कर्मचाऱ्याला एंट्री नोंद करण्यास सांगितले असता सुरक्षारक्षकाने अभिषेक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेवणाचे पार्सल देऊन अभिषेक खाली आले असता सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. काही क्षणातच सुरक्षारक्षकाचे काही साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली . चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे. याच दरम्यान ज्या महिलेने पार्सल ऑर्डर केली होती ती महिला देखील मध्यस्थी करण्यासाठी तेथे आली. मात्र त्यांनी तिचेही काहीच ऐकून घेतले नाही आणि अभिषेक यांना मारहाण केली. ही मारहाण मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे .याप्रकरणी अभिषेक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे .

पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशनकडून कारवाई

दरम्यान या घटनेनंतर पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशनकडून (PCMA) कारवाई करण्यात आलेली आहे. या घटनेबद्दल त्यांनी एक स्पष्टीकरणही जारी केले आहे. ‘ सोसायटीत जो प्रकार घडला, अशा घटनांचं आम्ही समर्थन करत नाही आणि अशी वागणूक खपवूनही घेत नाही या भांडणात सहभागी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आम्ही तातडीने नोकरीवरून काढून टाकले आहे,’ असे नमूद करण्यात आले आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.