Dombivli Crime : भावाला मारहाण केली म्हणून तो संतापला, कुऱ्हाड घेऊन परिसरात माजवली दहशत, गाड्याही फोडल्या
सांस्कृतिक डोंबिवलीमध्ये आता कुऱ्हाड घेऊन वारणाऱ्या तरूणामुळे दहशत माजली आहे. त्या तरूणाने काही वाहनांची तोडफोडही केल्याचे समोर आले.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 16 नोव्हेंबर 2023 : सांस्कृतिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहराच्या कोयत्याची दहशत नंतर सांस्कृतिक डोंबिवलीमध्ये आता कुऱ्हाड घेऊन वारणाऱ्या तरूणामुळे दहशत माजली आहे. किरण बाळू शिंगारे असे तरूणाचे नाव असून त्याने काही वाहनांची तोडफोडही केल्याचे समोर आले आहे.
शहरात कुऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या किरण याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून त्यामुळे शहरातत मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक त्यांचा जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकून अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
भावाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हातात घेतली कुऱ्हाड
पुणे शहराच्या कोयत्याची दहशत नंतर सांस्कृतिक डोंबिवलीमध्ये आता कुऱ्हाडीची दहशत माजली आहे. ही कुऱ्हाड घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाचे नाव किरण बाळू शिंगारे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार किरणच्या तरुणाच्या भावाला दोन ते तीन दिवसांपूर्वी काही कारणाने परिसरातील इतर तरुणांनी मारहाण केली होती. हे समजल्यानंतर किरण संतापला. भावाचा बदला घेण्यासाठी रात्रीच्या वेळी तो कुऱ्हाड घेऊन बाहेर पडला. काल रात्रीही तो अशाचा प्रकारे फिरत होता. मध्यरात्री दोनच्या सुमारा डोंबिवली पश्चिमेतील जुने डोंबिवली परिसरात दहशत दाखवण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उतरला. एवढेच नव्हे तर भररस्त्यात त्याने रिक्षा थांबवून रिक्षा चालकांना मारहाण केली आणि एक रिक्षा तसेच एका बाईकचीही तोडफोड केली. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि दहशत माजली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.