Dombivli : पोलीस स्टेशनच्या बाजूच्याच दुकानात चोरांचा डल्ला, शटर तोडून लाखोंचा माल लंपास

चोरटे हे अवघ्या एका रात्रीमध्ये 9 ते 10 दुकानांचे शटर उचकटून आत शिरले आणि त्यांनी तेथील लाखोंचा माल लंपास केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे चोरीची ही घटना डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून असलेल्या सोसायटीत घडली

Dombivli : पोलीस स्टेशनच्या बाजूच्याच दुकानात चोरांचा डल्ला, शटर तोडून लाखोंचा माल लंपास
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 9:15 AM

डोंबिवलीमध्ये गेल्या काही महिन्यात गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही, असाच प्रश्न सध्या निर्माण होत आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतीच धालेली तचोरी. चोरट्यांनी चक्क पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्येच हात साफ करत लाखोंचा माल लुटला. जवळपास 9 ते 10 दुकानांवर डल्ला मारत चोरट्यांनी तिथला माल चोरला. दुकानांचं शटर तोडून ही चोरी करण्यात आली. पोलिस स्टेशन अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाही चोरट्यांनी ही क्लुप्ती केल्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा काहीच धाक न उरल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितिनुसार, चोरटे हे अवघ्या एका रात्रीमध्ये 9 ते 10 दुकानांचे शटर उचकटून आत शिरले आणि त्यांनी तेथील लाखोंचा माल लंपास केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे चोरीची ही घटना डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून असलेल्या सोसायटीत घडली. पोलिस स्टेशनच्या शेजारी असलेल्या साईनाथ सोसायटीमधील सहा दुकाने, तसेच तेथेच बाजूलाच टॉकीजजवळील दोन ते तीन दुकाने, आणि डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरांनी घुसून हात साफ केला. या घटनेत लाखो रुपयांचा माल लांबवण्यात आला.

काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर तीन चोरटे मध्यरात्री शटर उघडून चोरी करताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांनी सुरक्षा डोअर व शटर लॉक लावूनही चोरी घडल्याने खळबळ माजली आहे. ज्या परिसरात पोलिस स्टेशन एवढ्या जवळ ाहे तेथे चोरी होतेच कशी, पोलिसांचा काहीच धाक नाही का, कायदा-सुरक्षाव्यवस्थेचं काय ? असे अनेक सवाल व्यापारी वर्गाकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याप्रकरणी सध्या रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास वेगाने सुरू आहे. मात्र या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.