Dombivli Accident News : वेगाने निघालेल्या डंपरने एकाला चिरडले, चेहरा इतका विद्रुप झाला की….,
शहरात एका फुतपाथवर झोपलेल्या व्यक्तीला भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने चिरडले. त्या व्यक्तीचा चेहरा इतरा विद्रुप झाला आहे की, पोलिस टेन्शनमध्ये आले आहेत.
डोंबिवली : डोंबिवली-कल्याण (Dombivli-kalyan) या भागात नेहमी अपघात होत असतात. त्याचबरोबर अशा पद्धतीचे अपघात असतात की, त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागतो. आतापर्यंत असे अनेक अपघात त्या शहरात अधिक घडले आहेत. सध्या डोंबिवली पूर्वेतील डॉ.राजेंद्र प्रसाद रोडवर नुकताचं एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, भीषण आवाजामुळे परिसर घाबरला आहे. वेगाने निघालेला डंपर एका व्यक्तीला जोराची धडक दिली, त्यावेळी डंपर तोंडावरुन गेला आहे. त्या व्यक्तीचा जागीचं मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा चेहरा इतका विद्रुप झाला आहे की, त्या मृतदेहाची (Deadbody) ओळख पटवताना पोलिसांनी दमछाक होत आहे.
नेमकं काय झालं
डोंबिवली पूर्वेतील डॉ राजेंद्र प्रसाद रोडवर शुक्रवारी संध्याकाळी डम्परने दिलेल्या धडकेत एका पदचाऱ्याचा मृत्यू झाला. सद्या सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्ते कामांसाठी लागणारा माल घेऊन येणारे डंपर चालक शहरातून भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच एका डम्परचे चाक एका पादचाऱ्याचा डोकीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या पादचाऱ्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिथल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात त्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी एक पादचारी डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जात असताना रघुकूल सोसायटीजवळ डम्परने पदचाऱ्याला जोराची धडक दिली. या धडकेत पादचारी डम्परच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पादचारी जोरात ओरडल्याने घाबरलेल्या डम्पर चालकाने वेग कमी केला. कोणत्या तरी बांधकाम कंपनीच्या मालकीचा हा डम्पर आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी डंपर चालक आणि मालक यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याबरोबर नेमकी चुकी कोणाची आहे हे सुध्दा चौकशीत स्पष्ट होईल. सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.