Dombivli : 21 लाख जळून खाक ! एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात चोरांचा कारनामा

चोरीचे काही गुन्हे ऐकून सामान्य माणूस हैराणच होतो. चोरीचा असाच एक गुन्हा डोंबिवलीमध्ये उघड झाला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही डोक्यावरच हात मारून घ्याल. चोरांनी एक रुपयाही चोरला तर नाही, पण त्यांच्या कारनाम्यामुळे तब्बल 21 लाख रुपये जळून खाक झाले.

Dombivli : 21 लाख जळून खाक ! एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात चोरांचा कारनामा
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 9:26 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 16 जानेवारी 2024 : चोरीच्या, गुन्ह्यांच्या विविध घटना कानावर समोर येत असतात. गुन्ह्याच्या अनेक कार्यपद्धतींबद्दल कानावर काहीबाही पडत असतं. पण त्यातील चोरीचे काही गुन्हे ऐकून सामान्य माणूस हैराणच होतो. चोरीचा असाच एक गुन्हा डोंबिवलीमध्ये उघड झाला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही डोक्यावरच हात मारून घ्याल. चोरांनी एक रुपयाही चोरला तर नाही, पण त्यांच्या कारनाम्यामुळे तब्बल 21 लाख रुपये जळून खाक झाले.

खरंतर चोरी करायला गेलेल्या चोरट्यांमुळे एटीएमला आग लागली, त्यात 21 लाख रुपये जळाले. इतकेच नाही चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरी केला. या घटनेचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरु केला आहे.

चोरीच्या प्रयत्नात 21 लाख जळाले

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डोंबिवलीतील महात्मा फुले रोड येथे घडली. तेथे असलेल्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शनिवार,13 जानेवारीच्या मध्यरात्री या एटीएम मशीनणधील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ते आधी एटीएममध्ये घुसले आणि चोरीचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या गॅस कटरचा वापर सुरु केला.

मात्र एटीएम मशीन कट करीत असताना त्यातील गॅसमुळे आणि उष्णतेमुळे एटीएम मशीनला अचानक आग लागली. आणि या आगीत मशीनमधील तब्बल 21 लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. आग लागताच चोरटे तिथून पळाले. मात्र चोरट्यांनी तेथे लावण्यात आलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेच, तसेच एटीएमचे अंतर्गत भागही खराब झाले. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. “एटीएम बूथचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम’च्या अधिकाऱ्याने दिलेल्या तपशिलांच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे,असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेने डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.