Dombivli Crime : जरा धक्का लागला आणि ठो ठो ठो.. लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार, एक जखमी
डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरून लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोळीबार झाला आहे. डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील एका बारमध्ये ही घटना घडली. रात्री दीडच्या सुमारास हा गोळीबार झाला. त्यामध्ये एक जण जखमी झाला आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 10 जानेवारी 2024 : डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरून लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोळीबार झाला आहे. डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील एका बारमध्ये ही घटना घडली. रात्री दीडच्या सुमारास हा गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.
डोंबिवली मानपाडा परिसरात काल रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सेवन स्टार नामक लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार मध्ये आत्ता लागल्याचा वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. घटनेत विकास भंडारी नामक एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री एक वाजून दहा मिनिटांनी विकास भंडारी नामक तरुण मानपाडा परिसरातील लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार मध्ये गेला होता यावेळेस बारमध्ये बसलेल्या अजय सिंग नामक व्यक्तीला त्याचा धक्का लागला यामुळे दोघात बारमध्येच वाद सुरू झाला या वादातून संतपलेल्या अजय सिंग व त्याच्या चार साथीदाराने बार मध्ये फायरिंग करत भंडारी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ती गोळी भंडारी च्या खांद्याला लागली असून या घटनेतून गंभीर जखमी झाला यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मानपाडा पोलिसांनी याबाबत अजयसिंह चार इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.