Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli Crime : मित्राचे पैसे काढण्यासाठी बिश्नोई गँगच्या नावे धमकी, दोघांना अटक

मित्राचे पैसे काढण्यासाठी दोन आरोपींनी एका बांधकाम व्यावसायिकाला बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली.पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या.

Dombivli Crime : मित्राचे पैसे काढण्यासाठी बिश्नोई गँगच्या नावे धमकी, दोघांना अटक
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 4:13 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 16 ऑक्टोबर 2023 : कल्याण -डोंबिवली परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेची धास्ती वाढली. या शहरांमधील गुन्हेगारीचं (crime in city) वाढतं प्रमाण हे सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण बनलं आहे. पोलिसांनी कारवाई करूनही गुन्हेगारांना आळा बसत नाहीये. त्यातच आता शहरात एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी (threat call)  मिळाल्याने शहर हादरलं आहे.

मित्राचे पैसे काढण्यासाठी दोन आरोपींनी एका बांधकाम व्यावसायिकाला बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रामनगर पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या. आकाश रमेश गिरी आणि इंद्रजीत यादव अशी त्यांची नावे असून या आरोपींनी आणखी कोणाकोणाला अशी धमकी दिली आहे आणि त्यांचा या गँगशी काय संबंध आहे, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मध्यरात्री फोन खणखणला आणि..

डोंबिवलीतील प्रशांत विठ्ठल जाधव हे बांधकाम व्यावसायिक राहतात. 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास त्यांचा फोन खणखणला. जाधव यांनी फोन उचलला आणि समोरच्याचं बोलणं ऐकून ते हादरलेच. कॉलवरील समोरच्या व्यक्तीने आपण बिश्नोई गँगचा माणूस बोलत असल्याचे सांगितले. तू इंद्रजित यादव याचे पैसे दे नाहीतर काही खरं नाही, तुझा मर्डर करेन, अशा शब्दात त्याने जाधव यांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली.

या कॉलमुळे धास्तावलेल्या जाधव यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. बिश्नोई गँगचं नाव समोर आल्याने रामनगर पोलिसांनी तत्काळ तपास केला. अथक तपासानंतर त्यांनी आकाश रमेश गिरी आणि इंद्रजित राजाराम यादव या नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांची चौकशी करण्यात आली असता खरं काय ते समोर आलं.

इंद्रजित हा प्रशांत जाधव यांच्याकडे कामाला होता. त्याचे काही पैसे जाधव यांनी देणे बाकी होते. इंद्रजितने वारंवार मागूनही जाधव यांनी पैसे काही दिले नाहीत त्यामुळे तो खूप वैतागला होता. अखेर त्याने याबद्दल त्याचा मित्र आकाशला सांगितले आणि त्यांनी दोघांनी हा प्लान आखला. आकाश याने विठ्ठल यांना धमकावण्यासाठी कॉल करत स्वतःला बिश्नोई गँगचा शूटर असल्याचे सांगितल. सध्या या प्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....