Dombivli Crime : इराणी टोळीकडून घेतलं चोरीचं ट्रेनिंग, सराईत चेन स्नॅचर्सना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

या दोघांनी मानपाडा ,डोंबिवली, विष्णुनगर, महात्मा फुले ,कल्याण तालुका ,कोळशेवाडी व नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Dombivli Crime : इराणी टोळीकडून घेतलं चोरीचं ट्रेनिंग, सराईत चेन स्नॅचर्सना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 11:26 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 1 नोव्हेंबर 2023 : डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी, पाकिटमारी , चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये ( crime news) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाईकवरून येऊन पादचाऱ्यांची गळ्यातील चेन किंवा त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

तसेच त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले. वारिस खान, मोहम्मद कुरेशी अशी या दोन्ही आरोपींची नावे असून ते दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांविरोधात कल्याण डोंबिवली ,नवी मुंबई येथील पोलिस ठाण्यात 9 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून याप्रकरणी कल्याण मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

इराणी टोळीकडून घेतलं ट्रेनिंग

काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्व येथील भोपर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला दोघांनी धक्काबुक्की केली आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचताना फरपटत नेत जखमी केले होते. याप्रकरणी कल्याण मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कल्याण झोन तीनचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाळे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने,पोलीस अधिकारी सुनील तारमळे, पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक तपासही केला, त्याआधारे वारिस खान, मोहम्मद कुरेशी नावाच्या दोन आरोपींना कल्याण जवळील आंबिवली परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबूली दिली. आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत राहणाऱ्या चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगचे ट्रेनिंग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर चोरीला सुरूवात करत मानपाडा ,डोंबिवली, विष्णुनगर, महात्मा फुले ,कल्याण तालुका ,कोळशेवाडी व नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या केल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली.

त्यांचे नऊ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून या दोघांकडून आठ लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या दोन्ही सराईत चोरट्यांनी अशा प्रकारे आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.