प्ले झोनमध्ये नेताना तुमच्या मुलांना सांभाळा, डोंबिवलीत जे घडलं ते तुमच्या मुलांबाबतही घडू शकतं; ‘त्या’ प्रकाराने सर्वच…

लहान मुलं खेळत असताना त्यांच्याकडे डोळ्यातं तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं असतं. जरासही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

प्ले झोनमध्ये नेताना तुमच्या मुलांना सांभाळा, डोंबिवलीत जे घडलं ते तुमच्या मुलांबाबतही घडू शकतं; 'त्या' प्रकाराने सर्वच...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 12:58 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 3 नोव्हेंबर 2023 : लहान मुलांना खेळायला प्रचंड आवडतं. पण ते खेळत असताना त्यांच्याकडे डोळ्यातं तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं असतं . जरासंही दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. एखादी दुर्घटनाही घडू शकते. अशीच एका धक्कादायक घटना डोंबिवलीच्या (Dombivli news) नामवंत सोसायटीमध्ये घडली. मात्र त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं.

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीतील प्ले झोन मध्ये खेळत असताना लोखंडी अँगलमध्ये डोकं अडक्याने अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सक्षम उंडे असे या मुलाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या धक्कदायाक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील मानपाडा परिसरात रीजन्सी अनंतम ही सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना सक्षम हा पाच वर्षाचा मुलगा आहे. ३१ तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला. त्याची आई तेथे बाहेरच उभी होती. मात्र खेळता खेळता एका खेळण्याच्या साहित्यामध्ये त्याचं डोकं अडकलं आणि तो बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने तेथील कामगारांचे सक्षमकडे लक्ष गेले असता, त्यांनी तातडीने धाव घेऊन त्याला बाहेर काढलं. उपचारांसाठी त्याला तातडीने एम्स हॉस्पिटमलध्ये नेण्यात आलं.

मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे ऐकून त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची आई, वडील शोकाकुल झाले. त्यांच्या दु:खाला पारावर उरला नाही. अवघ्या ५ वर्षांच्या या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.