Dombivli Crime : काहीच नाही सापडलं म्हणून थेट सलूनच फोडलं, चोरीसाठी लढवली अभिनव शक्कल; पोलीसही चक्रावले

सलूनचे शटर उघडून आत घुसून चोरट्यांनी महागडी मशीन्स, मौल्यवान वस्तू आणि मोठी रोख रक्कम पळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dombivli Crime : काहीच नाही सापडलं म्हणून थेट सलूनच फोडलं, चोरीसाठी लढवली अभिनव शक्कल; पोलीसही चक्रावले
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 10:21 AM

डोंबिवली | 20 सप्टेंबर 2023 : सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या डोंबिवली (Dombivli news) शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण (crime news) वाढले असून डोंबिवली पूर्वेकडे देखील गुन्ह्याची अशीच एक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड येथे एका सलूनमध्ये (theft in salon) मोठी चोरी झाली आहे. बनावट किल्लीच्या सहाय्याने सलूनचे शटर उघडून चोरट्यांनी सलूनमधील माल लांबवला आहे. महागडी मशीन्स, किंमती सामानासह दहा हजारांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवल्याचे समोर आले आहे.

ही चोरी सलूनमध्ये काम करणाऱ्या चोरट्यांनीच केल्याचे संशय सलूनच्या मालकाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे

नक्की काय घडलं ?

डोंबिवली पूर्व येथील टिळक रोडवर भागवत धायरे यांचे कट अँड केअर नावाचे हेअर कटिंग सलून आहे. 11 सप्टेंबरच्या सकाळी धायरे हे नेहमीप्रमाणे सलूनमध्ये गेले असता, त्यांना सलूनचे शटर आधीच उघडलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी लगेच आतमध्ये जाऊन पाहिले तर सलूनमध्यो चोरी झाल्याचे आढळले. चोरट्यांनी बनावट किल्लीचा वापर करून सलूनच्या शटरचे कुलूप उघडले आणि ते आत घुसल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांनी सलूनमधील महागडी मशीन्स, मौल्यवानू वस्तू तर चोरल्याच पण काऊंटरमध्ये ठेवलेली दहा हजारा रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लांबवल्याचे धायरे यांच्या लक्षात आले.

या चोरीमुळे त्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाणे गाठले आणि या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या दुकानात गेल्या तीन महिन्यांपासून आरिफ नावाचा एक इसम काम करत होता. त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय धायडे यांनी पोलिसांसमोर व्यक्त करत चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी केली. तसेच इतर दुकानदारांनी दुकानात कामगार ठेवताना त्यांची पूर्ण खात्री करूनच, संपूर्ण माहिती घेऊन, नीट शहानिशा करून मगच त्यांन कामावर ठेवावे. जेणेकरून आपले जसे नुकसान झाले तसे इतर कोणाचे होणार नाही, असे सांगत त्यांनी कामगार ठेवताना नीट माहिती काढावी असे आव्हान धायरे यांनी सर्वांनाच केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.