Dombivli News : स्पीकरचा आवाज कमी करा सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं…

सध्या सर्वत्र परीक्षांचा सीझन सुरू आहे. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, हाच आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या एका इसमाला मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. कारण त्याने स्पीकरचा आवाज कमी करायला सांगताच शेजारचे भडकले आणि त्यांनी त्या इसमालाच बेदम मारहाण केली.

Dombivli News : स्पीकरचा आवाज कमी करा सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं...
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 8:51 AM

डोंबिवली| 12 मार्च 2024 : सध्या सर्वत्र परीक्षांचा सीझन सुरू आहे. राज्यभरातील शाळकरी विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स यासह १०वी, १२वीच्या ही बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी वर्षभराच्या अभ्यासाची उजळणी करून शांतपणे अभ्यास करून पेपर द्यायचा प्रत्येक विद्यार्थ्याचा मानस असतो. मात्र आजूबाजूचे गोंधळ, आवाज यामुळे काही वेळा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. असाच त्रास डोंबिवली पूर्वेतील विद्यार्थ्यांना झाला. शेजारच्या घरी वाढदिवसानिमित्त पार्टी सुरू होती आणि मध्यरात्र उलटून गेली तरी स्पीकरवरून लावलेल्या गाण्यांचा आवाज कमी होत नव्हता. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, हाच आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या एका इसमाला मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. कारण त्याने स्पीकरचा आवाज कमी करायला सांगताच शेजारचे भडकले आणि त्यांनी त्या इसमालाच बेदम मारहाण केली.

सुसंस्कृतांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत हा धक्कादायक प्रकार घडला. डोंबिवलीमधील रामनगर पोलीस ठाणे हद्दीतीत शेतार चौक येथे शनिवारी संध्याकाळी एका रहिवाशाच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी त्यांच्या घरी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावण्यात आली होती. पण यामुळे इतर नागरिकांना त्रास होत होता. म्हणूनच एका रहिवाशाने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. सकाळी कामावर जायाचे आहे, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा, असे एका इसमाने सांगितले. पण याच सांगण्याचा राग आल्याने दोन तरूणांनी त्या इसमाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडती.

श्याम दीपक सोनावणे (३५) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. ते या मारहाणीत जखमी झाले. सोनावणे हे डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागातील इंदिरानगर मध्ये राहतात. शनिवारी इंदिरानगर मध्ये रामदास अहिरे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे साडेबारा वाजून गेले तरी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजातील गाणी सुरूच होती. अहिरे यांच्या शेजारी राहणारे, श्याम सोनावणे आणि इतर शेजाऱ्यांनी अहिरे यांना गाण्यांचा, लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. पण अहिरे कुटुंबियांना त्ंयाचा राग आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर असलेल्या दोन तरूणांना श्याम यांचे बोलणे सहन न झाल्याने त्यांनी श्याम यांच्याशी हुज्जत घालून त्यांना बेदम मारहाण केली. ते बरेच जखमी झाले. त्यानंतर सोनावणे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.