Mumbai Crime : बायको, आजारी भाऊ, बेसबॉल बॅट आणि खुनी खेळ… मालाडमध्ये काय घडलं ?

प्रॉपर्टीच्या वादातून एका इसमाने त्याचती पत्नी तसेच त्याच्या लहान भावावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. हा वार एवढा घातक होता त्याच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी भावाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

Mumbai Crime : बायको, आजारी भाऊ, बेसबॉल बॅट आणि खुनी खेळ... मालाडमध्ये काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 11:40 AM

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मालाड | 13 जानेवारी 2024 : मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. मालड पश्चिम येथील बांगुर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलं. प्रॉपर्टीच्या वादातून एका इसमाने त्याचती पत्नी तसेच त्याच्या लहान भावावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. हा वार एवढा घातक होता त्याच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी भावाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

दोघांचीही हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. अखेर पोलिसांनी १२०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत त्या आरोपीला कलकत्ता येथून अटक केली. ड्रेसन डिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चित्रा ड्रेसन डिसा आणि डेमियन डिसा अशी मृतांची नाव आहेत.

प्रॉपर्टीच्या वादातून केली हत्या

मालाड पश्चिमेकडील बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एवरशाईन नगर परिसरात हे हत्याकांड घडलं. आरोपी ड्रेसन डिसा यांच्या घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. त्यामुळे १० दिवसांपूर्वी आरोपी ड्रसेन याने त्याची पत्नी चित्रा आणि भाऊ डेमियन या दोघांवरही बेसबॉलच्या बॅटने जोरात वार केले.नंतर ड्रेसन तिथून पळून गेला. या हल्ल्यामध्ये चित्राचा जागीच मृत्यू झाला तर डेमियन हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण तेथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी बांगुर नगर पोलीस ठाण्यात कलम ३०२,३०७ भादवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरपीचा कसून सोध घेण्यास सुरूवात केली. बांगुर नगर पोलिसांनी तब्बल बाराशे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. अखेर दहा दिवसानंतर आरोपी ड्रेसन याला कलकत्ता येथील हॉटेलमधून अटक केली आहे.सध्या आरोपी हा बांगुर नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.