63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या, 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक

मध्य प्रदेशातील छतरपूर शासकीय रुग्णालयातील डॉ. नीरज पाठक यांची हत्या झाली होती. (Dr Neeraj Pathak Murder Case )

63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या, 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक
Dr Neeraj Pathak Murder Case
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:39 AM

भोपाळ : 63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या केल्या प्रकरणी 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक करण्यात आली आहे. पतीसोबत दीर्घ काळापासून सुरु असलेल्या वादातून पत्नीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पत्नीने जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून आधी पतीला बेशुद्ध केलं, त्यानंतर त्याला विजेचा झटका देऊन ठार मारलं. (Dr Neeraj Pathak Murder Case in Madhya Pradesh Chhatarpur Professor Wife Mamata Pathak arrested)

बाहेरगावी गेल्याचा पत्नीचा बनाव

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छतरपूर शासकीय रुग्णालयातील डॉ. नीरज पाठक यांची हत्या झाली होती. त्यांची पत्नी ममता पाठक हिनेच हत्येची नोंद पोलिसात केली होती. हायप्रोफाईल केस असल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली. आपण झाशीला गेलो होतो, तिथून परतल्यावर घरात पतीचा मृतदेह सापडला, असं पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं.

पोस्टमार्टम अहवालात गुपित उघड

पोलिसांनी डॉ. नीरज पाठक यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले, तेव्हा त्यांच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अंश आढळले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या पत्नीवर संशय बळावला. पती-पत्नीमध्ये दीर्घ काळापासून वाद असून दोघांचे संबंध तणावपूर्ण होते. पोस्टमार्टम अहवालानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता पत्नीने हत्येची कबुली दिली.

जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या

छतरपूरचे डीएसपी शशांक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पत्नी ममता पाठक यांचे पती डॉ. नीरज पाठक यांच्यासोबत दीर्घ काळापासून वाद सुरु होते. 29 एप्रिलला संधी साधून ममताने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या. पती बेशुद्ध झाल्यानंतर विजेचा झटका देऊन त्यांची हत्या केली.

कोणाला संशय येऊ नये, यासाठी पत्नी डॉ. पाठक यांचा मृतदेह घरीच सोडून झाशीला निघून गेल्या. दोन दिवसांनी त्या परतल्या. 1 मे रोजी त्यांनी स्वतःच पतीच्या हत्येची एफआयआर दाखल केली. पोलिसांनी कसून चौकशी करत हत्याकांडाचा पर्दाफाश केले. पत्नीने एकटीनेच हे कृत्य केलं असून त्यात इतर कोणाचाही सहभाग असल्याचे पोलिसांना पुरावे आढळलेले नाहीत.

संबंधित बातम्या :

वकील पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या, सीसीटीव्हीत वकील प्रियकर दिसल्याने पर्दाफाश

साडीने गळा आवळून पतीची हत्या, 35 वर्षीय महिलेला अटक

(Dr Neeraj Pathak Murder Case in Madhya Pradesh Chhatarpur Professor Wife Mamata Pathak arrested)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.