‘ड्रीम गर्ल’ ने लावला तरूणांना चुना, मुलीचा आवाज काढून अनेकांची फसवणूक

आयुष्यमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना खूप यश मिळालं आणि त्यातील आयुष्यमानच्या भूमिकेचेही खूप कौतुक झालं. ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाप्रमाणे मोबाइलवर बोलताना मुलीचा आवाज काढून अनेक तरूणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

'ड्रीम गर्ल’ ने लावला तरूणांना चुना, मुलीचा आवाज काढून अनेकांची फसवणूक
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 8:49 AM

ब्रिजभूषण जयस्वाल, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 डिसेंबर 2023 : आयुष्यमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना खूप यश मिळालं आणि त्यातील आयुष्यमानच्या भूमिकेचेही खूप कौतुक झालं. त्यामध्ये तो मोबाईलवर मुलीच्या आवाजात बोलताना दाखवला आहे. मात्र अशाच एका ‘ड्रीम गर्ल’ मुळे मुंबईत अनेक तरूणांना मोठा फटका बसला आहे. ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाप्रमाणे मोबाइलवर बोलताना मुलीचा आवाज काढून अनेक तरूणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मुंबई पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुनील मोदी (62)  आणि संकेत चव्हाण (23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्या दोघांनीही वधू-वर सूचक मंडळ अर्थात मॅट्रिमोनिअल साईटवरून बऱ्याच तरूणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सुनील मोदी आणि संकेत चव्हाण यांनी माटुंगा येथील एका सॉफ्टवेअर तरूणाची अशीच फसवणूक केली होती. त्यानेच पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्याच आधआरेन गुन्हा दाखल करून कारवाई करत पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मोदी आणि संकेत चव्हाण हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. आर्थर रोड जेलमध्ये त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी व्हॉईस चेंजिंग टेक्निकचा वापर करून आवाज बदलत अनेक पुरुषांशी महिलांच्या आवाजात संपर्क साधला आणि त्यांना विश्वासात घेऊन नंतर त्यांची फसवणूक केली. एवढंच नव्हे तर दोन्ही आरोपींनी मॅट्रिमोनिअल साइटवर अश्विनी मनोहर पंडित या महिलेच्या नावे एक फेक प्रोफाईलही तयार केले. तसेच तिच्या नावाने न्यायालयीन शिक्के तयार करून अस्विनी ही महानगर दंडाधिकारी असल्याचे दाखवले.

तरूणांची फसवणूक करण्यासाठी त्या दोघांनी नाशिकमधील एका तरूणीचा फोटोही वापरला. या प्रोफाईलला भुलून अनेक तरूणांनी मॅट्रिमोनिअल साइटवर तिच्याशी संभाव्य वधू म्हणून संपर्क साधला. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींच्या नावाने बनावट वॉरंट तयार करण्याचे कामही मोदी करत होता. माटुंग्यातील एका तरूणाला याचा चांगलाच फटका बसला आणि त्याने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.