बसमधून प्रवास करत होते… 5 लोकं आरामात बसले, पोलिसांची अचानक धाड, झडती घेताच… काय घडलं ‘त्या’ प्रवासात?

हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या एका बसमध्ये डीआरआयने छापा टाकून 16 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची किंमत 24 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1.93 कोटी रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. डीआरआयला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. पुढील तपास सुरू आहे.

बसमधून प्रवास करत होते... 5 लोकं आरामात बसले, पोलिसांची अचानक धाड, झडती घेताच... काय घडलं 'त्या' प्रवासात?
क्राईम Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 1:56 PM

डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने हैदराबादहून मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये छापा मारला. यावेळी 16 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात 24 कोटी इतकी किंमत आहे. याप्रकरणी पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन आरोपींकडून 1.93 कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे पाचही जण बसमधून आरामात जात होते. आपण पकडले जाऊ हे ध्यानीमनीही नसताना त्यांच्यावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी धाड मारून मोठी कारवाई केली आहे.

डीआरएच्या मुंबई टीमला याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. हैदराबाद आणि मुंबईच्या दरम्यान बसमधून ड्रग्स तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या टीमने मंगळवारी पहाटेच या संदिग्ध लोकांवर नजर ठेवली होती. या टीमने बस थांबवून या पाचही जणांची झडती घेतली. त्यांचं सामान तपासलं. त्यावेळी त्यांच्याकडे 16 किलो ग्रॅम सफेद पावडर सापडला. हे मेफेड्रोन असल्याचं नंतर समजलं. हा एक सिंथेटिक मादक पदार्थ आहे.

घबाड सापडलं

अटक करण्यात आलेल्या दोन संशियातांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आणखी तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. यात एक ड्रग्स विकणारा आणि ड्रग्स घेणाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून 1.93 कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अधिक चौकशी सुरू

डीआरआयने या पाचही आरोपींविरोधात नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्स म्हणजे एडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तस्करीचं हे मोठं नेटवर्क असू शकतं. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. मेफेड्रोन हा एक सिंथेटिक मादक पदार्थ आहे. हे ड्रग्सच समजलं जातं. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 24 कोटी आहे. या प्रकरणी आता अधिक कसून तपास सुरू आहे. हे ड्रग्स आणणारे कोणत्या कोणत्या राज्यातील आहेत. त्यांचे कुणाशी लागेबांधे आहेत. याचा तपास सुरू झाला आहे. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? याचाही शोध घेतला जात आहे. तसेच ही टोळी कोणत्या कोणत्या राज्यात सक्रिय आहे आणि या मागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात आहे का? हे ड्रग्स कुणी पुरवले? या टोळीचं नेटवर्क कसं आहे? याचाही तपास करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.