मिठाच्या नावाखाली कोकेनची आयात! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमली साठा जप्त, ‘ऑपरेशन नमकीन’ची मोठी कारवाई

प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीनंतर हे मिठ नसून कोकेन असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

मिठाच्या नावाखाली कोकेनची आयात! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमली साठा जप्त, 'ऑपरेशन नमकीन'ची मोठी कारवाई
मोठी कारवाईImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:58 AM

नवी दिल्ली : गुजरातमध्ये (Gujrat Drugs News) अंमली पदार्थांच्या मोठा साठा जप्त करण्याची कारवाई सुरुच आहे. कोट्यवधी रुपयांचं कोकेन गुजरातमध्ये जप्त करण्यात आलं आहे. तब्बल 500 कोटी रुपयांच्या कोकेनवर गुजरातच्या बंदरावरुन हस्तगत करण्यात आलं आहे. डीआरआय (DRI Operation Namkeen) म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. 52 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात आयात केलेलं हे कोकेन इराणमधून आणलं गेलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे चक्क मिठाच्या (Salt) नावाखाली कोकेनची आयात करण्यात आल्याचंही उघड झालंय. जप्त करण्यात आलेल्या कोकेनबाबत डीआरआयनं सखोल माहिती दिली आहे. 24 ते 26 मे या काळात ही कारवाई करण्यात आली आहे.

मिठाच्या नावाखाली कोकेनची विक्री

25 मॅट्रिक टन 1 हजार मिठाच्या गोण्या असल्याचा दावा करत एक मालवाहू जहाज गुजरातच्या बंदरावर आलं होतं. या मालवाहू जहाजाबाबत डीआरआयला संशय आल्यानं त्यांनी या मालवाहू जहाजाची तपासणी केली. 48 तासांच्या तपासणीनंतर तब्बल 52 किलो कोकेन या मालवाहू जहाजामध्ये सापडलंय. मालवाहू जहाजातील गोण्या तपास असताना काही गोण्यांमधून एक वेगळाच गंध तपास अधिकाऱ्यांना आला होता. त्यामुळे काही पदार्थांची चाचणी करण्यासाठी हा मिठसदृश्य पदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

ऑपरेशन नमकीन

प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीनंतर हे मिठ नसून कोकेन असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणाची डीआरआय कसून चौकशी करतेय. गेल्या काही काळापासून गुजरात बंदरावर वाढलेल्या अंमलीपदार्थ विरोधी कारवायांनी चिंतादेखील व्यक्त केली जातेय. डीआरआयनं केलेल्या या कारवाईत मोठं यश आलंय. या मोहिमेला ऑपरेशन नमकीन असं नाव देण्यात आलं होतं.

गेल्या काही महिन्यांत कारवाईचा धडाका

तब्बल 321 किलो कोकेन जप्त करत 2021-22मध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंत कांडला बंदरवर जिप्स पावडरची आयात होत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी 205 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेलं. डीआरआयनं गेल्या काही महिन्यात अंमलीपदार्थविरोधी मोहीत राबवली असून या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद देखील केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.