अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

दोन्ही वेळेला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात गेली होती. | Mukesh Ambani explosive car

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी 'त्या' ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर
सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 10:21 AM

मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून या घटनेचा सध्या कसून तपास केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. (Explosive car found outside residence of Mukesh Ambani)

आता मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कार सोडणाऱ्या व्यक्तीविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी इनोव्हा गाडीच्या चालकाने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये या ड्रायव्हरचा चेहरा दिसू शकला नाही.

ही इनोव्हा गाडी दोनदा मुंबईत आली होती. दोन्ही वेळेला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात गेली होती. त्यामुळे पोलीस आता या माहितीच्याआधारे याप्रकरणाचे आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासत आहेत.

डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है, अंबानींच्या घराबाहेरील कारमध्ये लेटर

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह एक पत्रही मिळाले होते. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनचा मोठा साठा सापडला होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्र सरकारने तसे आदेशच दिले आहेत. तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसच करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनचा साठा सापडला होता. या प्रकरणाचा मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत होते. मात्र आता केंद्राने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. तसे आदेशच केंद्राने काढले आहेत. यापूर्वीही केंद्राने सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला होता. 7 महिने झाले. सुशांतसिंगने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट झालं नाही. आता हा तपास सुद्धा एनआयएने घेतला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

(Explosive car found outside residence of Mukesh Ambani)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.