Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी, दाऊदचा हस्तक दानिश चिकना राजस्थानमध्ये जेरबंद

सहा दिवसांपूर्वी अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या दानिशच्या ड्रग्जची फॅक्टरीवर छापा टाकला होता (Drug supplier Danish Chikna NCB)

डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी, दाऊदचा हस्तक दानिश चिकना राजस्थानमध्ये जेरबंद
ड्रग्ज फॅक्टरीचा मालक दानिश चिकना
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 1:17 PM

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला (Danish Merchant alias Danish Chikna) राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. दानिश चिकना मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. राजस्थान पोलिसांच्या मदतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दानिशला बेड्या ठोकल्या. (Drug supplier Danish Merchant alias Danish Chikna arrested in Rajasthan by the NCB)

छापेमारीपूर्वीच दानिश चिकनाची हातावर तुरी

दानिश चिकना याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती आहे. सहा दिवसांपूर्वी अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या दानिशच्या ड्रग्जची फॅक्टरीवर छापा टाकला होता. मात्र छापेमारीपूर्वीच निसटण्यात चिकना यशस्वी झाला होता. तेव्हापासूनच एनसीबी त्याच्या मागावर होती. राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करण्यात आले. त्याला मुंबईला आणले जात आहे.

एनसीबीच्या दोन गुन्ह्यात फरार

अनेक केसेसमध्ये फरार असलेल्या दानिशवर कारवाई करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. तर एनसीबीच्या दोन गुन्ह्यात तो फरार होता.

एजाझ खानलाही एनसीबीची अटक

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) यालाही अटक केली आहे. कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (30 मार्च) एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले.

ड्रग पेडलर शादाब बटाटाला (Shadab Batata) अटक झाल्यानंतर एजाझचे नाव या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीच्या टीमला एजाझ खान आणि बटाटा टोळीचे काही धागेदोरे सापडले होते, त्याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका मोठ्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला सुमारे दोन कोटी एमडी ड्रग्जसह अटक केली होती.

संबंधित बातम्या :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

ड्रग्ज प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर एजाझ खानला अटक, 3 एप्रिलपर्यंत NCB कोठडी

(Drug supplier Danish Merchant alias Danish Chikna arrested in Rajasthan by the NCB)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.