पत्नीच्या हातची भाजी आवडली नाही अन् संतापलेल्या पतीने तिला थेट.. धक्कादायक कृत्याने अख्खं गाव हादरलं !

आरोपी पती नेहमी दारू पिऊन त्याच्या बायकोला मारहाण करत असे असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबिायांनी केला आहे. घटनेच्या दिवशीही तो दारू पिऊन आला होता, आणि त्याच भरात त्याने..

पत्नीच्या हातची भाजी आवडली नाही अन् संतापलेल्या पतीने तिला थेट.. धक्कादायक कृत्याने अख्खं गाव हादरलं !
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 5:11 PM

लखनऊ | 14 ऑगस्ट 2023 : बायकोच्या हातची भाजी आवडली नाही म्हणून पतीने थेट तिलाच संपवल्याची (crime news) धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मृत्यूपूर्वी मॅजिस्ट्रेट समोर दिलेल्या जबानीत महिलेने तिची आपबीती सांगितली. दारूड्या नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले (husband killed wife) , हे समोर आल्यावर सगळे सुन्न झाले आहेत. एवढ्या शुल्लक गोष्टीसाठी कोणी असं कसं करू शकतं, असाच सवाल सध्या लोकांच्या मनात आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा जवळ पीडित महिला रहात होती. जोगमाया असे तिचे नाव असून ती 30 वर्षांची होती. पती मुकेश हा नेहमीच तिला मारहाण करत असे. जेवण चांगल बनवत नाही, भाजीला चव नाही, असे सांगत तो नेहमीच तिचा छळ करत असे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले. घटनेच्या दिवशी देखील (रविवारी) मुकेश हा दारू पिऊन घरी आला आणि बायकोला मारहाण करू लागला. यामध्ये गंभीर जखमी झाली.

मारू नका, मारू नका… करत राहिली विनंती

पीडित महिला तिच्या पतीकडे न मारण्याची विनंती करत होती. शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. पीडितेचा पती तिला दररोज मारायचा तिने अनेक वेळा तिच्या नातेवाईकांनाही फोन केला. ते घरी येऊन त्याला समजवायचे, पण तो सुधारलाच नाही. रविवारी देखील त्याने भाजी चांगली बनली नाही, चव आवडली नाही या कारणावरून पत्नीला बेदम मारायला सुरूवात केली. तेवढं करूनही त्याचं मन बरलं नाही म्हणून त्याने तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं.

मृत्यूपूर्वी महिलेने दिली जबानी

मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत पीडित महिलेने सांगितले की, भाजी चांगली झाली नाही, या कारणायाने पतीने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर रॉकेल ओतून जिवंत जाळले. पोलिसांनी याला दुजोरा दिला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.