सुष्मिता सेनच्या नवऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा… मेव्हुण्याचा कान चावला अन्… पुढे काय घडलं?
मध्यरात्री सुष्मिताचा नवरा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने सुष्मिताला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते पाहून मेव्हुणा तेथे पोहोचला. त्याने जावयाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जावई त्याच्या कानाला चावला...

दोन आयुष्य उद्ध्वस्त करणारे प्रकरण समोर आले. खरे तर जावई बापू दारू पिण्याचा शौकीन होता. तो अनेकदा दारूच्या नशेत घरी यायचा आणि पत्नीशी भांडण करायचा. घटनेच्या रात्रीही तो दारूच्या नशेत परत आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीचे माहेर हे शेजारीच होते. जावई बापूचे कृत्य पाहून भावजय ताबडतोब तेथे पोहोचली. तिने जावयाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण जावयाने पत्नीचा राग हा मेहुण्यावर काढला. तो रागाच्या भरात मेहुण्याचा कानाला चावला.
गुन्हा करून जावई बापू फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पश्चिम बंगालमधील सोनारपूरमधील नोआपारा आनंदपल्ली येथील ही घटना आहे. सौरव सेन असे आरोपीचे नाव असून तो सोनारपूरमधील मालीपारा येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सौरव जवळपास दररोज दारू पितो. दारूच्या नशेत तो अनेकदा पत्नी सुष्मिता सेनला मारहाण करतो. शुक्रवारी रात्री उशिराही अशीच घटना घडली. सौरवने पत्नीवर अत्याचार केले. सुष्मिताचा भाऊ राजा शेजारच्या घरात राहतो. त्यामुळे बहिणीचा आरडाओरडा आणि भांडणाचा आवाज ऐकून तो घटनास्थळी पोहोचला.
मेहुण्याच्या कानाला चावला
बहिणीला वाचवण्यासाठी राजाने प्रयत्न केले. ते पाहून जावई, सौरव आणखी हिंसक झाल्याचा आरोप आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सौरवला आपला राग अनावर झाला आणि त्याने मेव्हुण्याच्या कानाचा चावा घेतला. एवढेच नाही तर पत्नी सुष्मिताला टेरेसवरून ढकलण्याचाही प्रयत्न केला. राजा गंभीर जखमी झाला. मध्यरात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनेक दिवसांपासून सुष्मिताचा छळ
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सुष्मिता ही गेल्या बऱ्याच काळापासून सौरवचा छळ सहन करत होती. आता त्यांनी हे संपूर्ण प्रकरण कायदेशीर मार्गाने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा हिंसक घटना घडू नयेत म्हणून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आरोपी सौरव सेनचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.