बाबांनी आजीला बेदम मारलंय…. नातवाच्या त्या फोनने उघड झाले क्रूर कृत्य !

आई-वडिलांची सेवा करून पुण्य कमावता येते असं म्हणतात. पण कलियुगात एका मुलाने त्याच्या जन्मदात्या आईलाच एवढी मारहाण केली की तिचा जीव जाता जाता राहिला. मुलाने आईला केलेल्या मारहाणीचे वळ अजूनही त्यांच्या शरीरावर दिसत आहेत.

बाबांनी आजीला बेदम मारलंय.... नातवाच्या त्या फोनने उघड झाले क्रूर कृत्य !
पैशांसाठी मुलाने बापाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 2:53 PM

फरीदाबाद : एकेकाळी श्रावण बाळाने त्याच्या वृद्ध मात्या- पित्याची सेवा करून एक आदर्श उदाहरण समोर ठेवले होते. पण आई-मुलाच्या प्रेमळ नात्यावरचा विश्वासच उडून जाईल अशी क्रूर घटना समोर आली आहे. कलियुगात मद्यपी मुलाने त्याच्या वयोवृद्ध आईला (son beaten up his mother) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत 80 वृद्ध महिला एवढी जखमी झाली आहे की तिचा जीव जाता जाता राहिला. अर्धमेल्या अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या वर सध्या इमर्जन्सी विभागात उपचार सुरू आहेत.

फरीदाबाद येथे ह क्रूर घटना घडली आहे. येथील ५ नंबर विभागात राहणाऱ्या कलियुगी मुलाने आपल्या वृद्ध आईला लाथा-बुक्क्यांनी तुडवले. ही मारहाण एवढी क्रूर होती की त्या महिलेचा जीवच गेला असता. मुलाने केलेल्या अनेक जखमा आईच्या अंगावर असून त्याच्या क्रौर्याची साक्ष देतात. त्या वृद्ध महिलेच्या मानेवरही खोल जखमा आहेत. जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या मानेवर लाथ मारण्यात आल्याचे समजते.

मुलाचा फोन आला अन् समोर आले भयानक सत्य

आरोपीचा अल्पवयीन मुलगा हर्ष याने त्याचा काका मुकेश यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिल्यावर ही क्रूर घटना उघडकीस आली. वडिलांनी आजीला बेदम मारहाण केली आहे, असे हर्षने त्याच्या काकांना फोनवरून सांगितले. त्या वृद्ध महिलेच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनीही ऐकला, त्यानंतर पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे.

पत्नीही सोडून गेली

मिळालेल्या महिलेनुसार, त्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला तिचाच पोटचा मुलगा गेल्या दोन-दिवसांपासून मारहाण करत आहे. दारूच्या नशेत तो हे कृत्य करत होता. यापूर्वी तो त्याच्या माजी पत्नीलाही अशीच मारहाण करत असे. या जाचाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आणि दोन मुलींसह माहेरी राहू लागली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तो आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा कसून तपास करत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी नमूद केले. पीडित महिलेचा दुसरा मुलगा मुकेश यानेही पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.