मद्याच्या नशेत मित्राशी केला विकृत प्रकार…दुसऱ्याने तयार केला व्हिडीओ
या भयानक प्रकाराने पिडीत युवक बेशुद्ध पडला होता. तो घरी न आल्याने त्याच्या पालकांनी शोधाशोध केली तेव्हा तो शुद्ध हरपलेला आणि वेदनेने व्हीव्हळत असताना सापडला.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील कोतवाली शहरातील एका भागात 23 ते 24 वर्षीय मित्रांनी दारूच्या नशेत मित्राशी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चिंतादायक गोष्ट म्हणजे त्यांनी या विकृतीचा व्हिडीओ देखील शूट केल्याचा प्रकार घडला आहे. या विकृतीमुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून व्हिडीओआधारे विकृत तरुणाला अटक करण्यात आली आहे.
भदोही जिल्ह्यातील कोतवाली विभागातील नगर क्षेत्राच्या हद्दीत एक विकृत प्रकार घडला आहे. या विभागाचे वरिष्ठ पोलीस भुवनेश्वर कुमार पांडे यांनी सांगितले की, ‘ 7 ते 8 जुलैमध्ये दरम्यानच्या रात्री 23 ते 24 वर्षीय तीन मित्रांनी मिळून प्रचंड दारू पिली. आणि दारूच्या नशेत त्यांच्यातील एका 24 वर्षीय मित्रावर मंहत नावाच्या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण वीरेंद्र मौर्या याने केले असून गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक झाली आहे.
या भयानक प्रकाराने पिडीत युवक बेशुद्ध पडला होता. तो घरी न आल्याने त्याच्या पालकांनी शोधाशोध केली तेव्हा तो शुद्ध हरपलेला आणि वेदनेने व्हीव्हळत असताना सापडला. वीरेंद्र मौर्या याच्या मोबाईलमधील शुटींग आधारे आरोपी मंहत याच्या विरोधात भादंवि कलम 377 ( अनैसर्गिक संबंध ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पिडीतावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात मोबाईलवर व्हिडीओ शूटींग करणाऱ्या तरुणालाच पोलीसांनी साक्षीदार केले आहे. आणि पुढील तपास सुरु आहे.