Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यपी तरुणाकडून डॉक्टरला मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मद्यपी तरुणांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना कल्याणमधील आंबिवली परिसरात घडली आहे. डॉक्टरने दारु प्यायला का विचारले म्हणून तरुणांनी डॉक्टरला मारले.

मद्यपी तरुणाकडून डॉक्टरला मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आर्थिक अडचणीला कंटाळलेल्या कामगाराने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 12:57 PM

कल्याण / सुनील जाधव : डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असता दारु प्यायला का विचारले म्हणून तरुणाने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणजवळील आंबिवली येथे घडली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रजापती असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर प्रथमेश पाटील आणि नंदकुमार पाटील अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

रंगपंचमी करताना पायाला दुखापत झाली

कल्याण अंबिवली अटाळी गावात काल रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाला पायाला काच लागली. यामुळे हा तरुण पायाला मलमपट्टी करण्यासाठी डॉ. नितीन प्रजापती यांच्या गुरुकृपा क्लिनिकमध्ये गेला. यावेळी तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची अवस्था पाहून डॉक्टरने त्याला दारु प्यायला का असे विचारले.

दोघांनी डॉक्टरला मारहाण केली

दारु प्यायला विचारल्याने तरुण संतापला आणि त्याच्या मित्राने डॉक्टरशी हुज्जत घालत मारहाण केली. याप्रकरणी आरोपी तरुणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करा अन्यथा आंबिवली परिसरातील क्लिनिक बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टर संघटनेने दिला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.