घर विकण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद, संतापलेल्या नवऱ्याने दोन मुलांसह बायकोसोबत केले ‘हे’ कृत्य

फ्लॅट विकण्यावरून नीरज आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले. फ्लॅट पत्नीच्या नावावर होता, तिला तो विकून पालम परिसरात दुसरे घर घ्यायचे होते.

घर विकण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद, संतापलेल्या नवऱ्याने दोन मुलांसह बायकोसोबत केले 'हे' कृत्य
पंजाबमध्ये शाळा उडवण्याची धमकी
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:34 PM

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि दोन मुलांवर चाकूने हल्ला (Knife Attack) करून स्वतःवर वार केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू (Death) झाला. आरोपी एसी दुरुस्तीचे काम करतो आणि गुरु अंगद नगर येथील फ्लॅटमध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी घर (Home) विकण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर नीरजने हे पाऊल उचलले.

जुना फ्लॅट विकून नवा घेण्यावरुन पती-पत्नीत वाद

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. फ्लॅट विकण्यावरून नीरज आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले. फ्लॅट पत्नीच्या नावावर होता, तिला तो विकून पालम परिसरात दुसरे घर घ्यायचे होते. पण नीरज त्यासाठी तयार नव्हता. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत असत. हे प्रकरण वुमन सेलमध्ये सुरू होते.

पत्नी-मुलांवर वार करुन स्वतःवरही वार

दरम्यान, मंगळवारी रात्रीही याच कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान नीरजला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीवर चाकूने वार केले. यावेळी बचावासाठी आलेल्या दोन्ही मुलांवरही हल्ला केला. यानंतर नीरजने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू

आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत घरातील सर्व लोकांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी नीरजच्या पत्नीला मृत घोषित केले. तर नीरजची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.