प्रेयसीने धोका दिला, नैराश्येतून प्रियकराने फेसबुक लाईव्ह करत जीवन संपवले !
तरुणाचे गावातील एका मुलीवर खूप प्रेम होते. तरुणाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र प्रेयसीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले.
महाराजगंज : प्रेयसीने धोका दिला म्हणून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तरुणाच्या या टोकाच्या निर्णयामुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरंदरपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते तरुणाचे
महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भगवानपूर येथे हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तरुणाचे गावातील एका मुलीवर खूप प्रेम होते. तरुणाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र प्रेयसीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले.
प्रेयसीचे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याने नैराश्येत होता
प्रेयसीचे लग्न ठरल्याने तरुण नैराश्येत होता. याच नैराश्येतून तरुणाने फेसबुक लाईव्हवर तरुणीचे आणि तिच्या नातेवाईकांची नावे घेत स्वतःचा गळा चिरत आत्महत्या केली. लाईव्ह सुरु असताना अनेकांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने कुणाचेही ऐकले नाही.
पोलिसांकडून सखोल तपास सुरु
तरुणाच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.