Mumbai Crime : मंगल कार्यालयाबाहेर घिरट्या घालायचे, अन् संधी मिळताच कारची काच फोडून ….

मंगल कार्यालयांबाहेर, तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर पाळत ठेवून संधी मिळताच त्यातील मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

Mumbai Crime : मंगल कार्यालयाबाहेर घिरट्या घालायचे, अन् संधी मिळताच कारची काच फोडून ....
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 3:00 PM

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण आणि तीव्रता दिवसेंदिवस (crime) वाढतच चालली असून या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. चोरी, लूटमार यासारख्या गुन्ह्यांसाठी भामटे नवनव्या क्लुप्त्या वापरत असल्याने पोलिसही जेरीस आले होते. त्याचदरम्यान गुन्ह्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली असून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यांवर विशेषत: मंगल कार्यालयांबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर पाळत ठेऊन, संधी मिळताच त्यांची काच फोडून त्यातील मौल्यवान वस्तूंची चोरी (theft) करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अखेर अटक (2 arrested) केली आहे. मात्र या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचा चोरीचा मोठा इतिहास आहे. शेरा (वय 39) आणि सर्फुद्दीन (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. तर विनोद ( वय 35) हा तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. लग्न, मुंज किंवा इतर समारंभासाठी कार्यालयात कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा वेळी अनेक लोकांच्या गाड्या मंगल कार्यालयाबाहेर उभ्या केल्यात जातात. आरोपी हे अशा गाड्यांवर पाळत ठेवायचे आणि संधी मिळताच, त्यांची काच फोडून लॅपटॉप, मोबाईल, कॅश अशा मौल्यवान वस्तू, रोख रक्कम लुटून फरार व्हायचे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि पालघर यासह विविध भागात गेल्या दीड वर्षात घडलेल्या अशाच प्रकारच्या 50 हून अधिक चोरीच्या घटनांमध्ये शेरा आणि विनोद यांचा हात असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, लॅपटॉप्स, मोबाईल फोन आणि एक दुचाकीही देखील जप्त केली आहे. त्यांना 11 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले असून, जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी एक ही रे रोड परिसरातून चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. शेरा आणि विनोद यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी सर्फुद्दीन याला डी.एन. नगर येथून तर शेरा याला कसारा येथून अटक करण्यात आली. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एमएचबी पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मुलांना भेटण्यासाठी शेरा हा अनेकदा कसारा येथे जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. डीसीपी अजयकुमार बन्सल आणि एसआय कुडाळकर, एपीआय सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि शेराला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तिसरा अद्याप फरार आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....