Omkar Realtors Case | विजय माल्याचा बंगला विकत घेणारा अभिनेता सचिन जोशीला ईडीची अटक
ईडीने समन्स बजावल्यानंतरही सचिन जोशी ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे ईडीने शनिवारी सचिन जोशी यांना ऑफीसला आणलं. सध्या सचिन जोशी ईडीच्या ताब्यात आहेत.
मुंबई : ईडीने अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीला ओंकार रिअल्टर्सप्रकरणी (The Omkar Realtors Case) अटक केली आहे (ED Arrested Actor And Businessman Sachin Joshi). हे प्रकरण मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या झोन-2 मध्ये रजिस्टर्ड आहे (ED Arrested Actor And Businessman Sachin Joshi).
सचिन जोशीने वर्ष 2017 मध्ये विजय माल्याचा गोव्यातील किंगफीशर बंगला विकत घेतला होता. सचिन जोशी JMJ ग्रूपचे प्रमोटर आहेत. जे पान मसाला, परफ्यूम, द्रव्य पदार्थ आणि दारुचा व्यवसाय करतात. सचिन जोशी प्लेबॉयच्या (रेस्टॉरंट आणि क्लब चेन) भारतीय फ्रेन्चायझीचे मालक आहेत. त्यांचं लग्न मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत झालं आहे.
ईडीने समन्स बजावल्यानंतरही सचिन जोशी ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे ईडीने शनिवारी सचिन जोशी यांना ऑफीसला आणलं. सध्या सचिन जोशी ईडीच्या ताब्यात आहेत.
अरमान जैन यांना ईडी दुसऱ्यांदा समन्स पाठवणार
याप्रकारे टॉप्स ग्रूपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राज कपूरचे नातू अरमान जैन यांना ईडी दुसऱ्यांदा समन्स पाठवणार आहे. यापूर्वी ईडीने अरमान जैन यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना समन्स पाठवण्यात आला होता आणि गुरुवारी त्यांना ईडी कार्यालयात दाखल होण्यास सांगण्यात आलं होतं. पण, अरमान जैन याने खाजगी कारण सांगत ईडीसमोर हजर नाही राहिला. त्यामुळे आता ईडी पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवणार आहे (ED Arrested Actor And Businessman Sachin Joshi).
याप्रकरणात अरमान जैनचं नाव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी मैत्री असल्याने पुढे आलं. हे दोघे चांगले जवळचे मित्र आहेत. त्यामुळे टॉप्स ग्रूप प्रकरणाच्या तपासात अरमान जैनचं नाव आलं. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगची याप्रकरणी दोनवेळा चौकशी झाली आहे.
टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरण, अरमान जैन ईडीच्या चौकशीला गैरहजरhttps://t.co/3qgIsRVqPp#TopsGroupScam #ArmanJain #ED
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
ED Arrested Actor And Businessman Sachin Joshi
संबंधित बातम्या :
इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड