Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Ramakrishna: अदृष्य ‘बाबा’च्या ‘इशाऱ्या’वरून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे काम करणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना ईडीकडून अटक; माजी पोलिस आयुक्त संजय पांडेविरोधातही गुन्हा दाखल

चित्रा रामकृष्ण या मुख्य नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ईडीने अटक करण्यापूर्वी ‘एनएसई’तील को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगी बाबाला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.

Chitra Ramakrishna: अदृष्य ‘बाबा’च्या ‘इशाऱ्या’वरून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे काम करणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना ईडीकडून अटक; माजी पोलिस आयुक्त संजय पांडेविरोधातही गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:20 PM

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई)(National Stock Exchange) पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण(Chitra Ramakrishna) यांना ईडीने अटक(ED arrests) केली आहे. चित्रा रामकृष्ण यांच्यासह माजी पोलिस आयुक्त संजय पांडे(former police commissioner Sanjay Pandey) देखील अडचणीत सापडले आहेत. संजय पांडे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. हिमालयातील एका अदृष्य ‘बाबा’च्या ‘इशाऱ्या’वरून त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे काम करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. चित्रा रामकृष्ण या बाबाला एनएसईची सर्व माहिती पुरवित होत्या. यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरु केला. चित्रा यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली यावेळी या बाबाबद्दलची माहिती समोर आली होती. यानंतर अनेकदा त्यांची चौकशी झाली. अखेरीस चित्रा रामकृष्ण यांना अटक झाली आहे. त्यांना 4 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

चित्रा रामकृष्ण या मुख्य नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ईडीने अटक करण्यापूर्वी ‘एनएसई’तील को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगी बाबाला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.

या प्रकरणी संजय पांडविरोधातही गुन्हा दाखल

या प्रकरणी ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. स्टॉक एक्स्चेंजच कर्मचाऱ्यांच्या अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात पांडे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सीबीआयने पांडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण आणि रामकृष्ण यांनी शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची मदत घेतली होती असा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

कोण आहे अदृष्य योगी बाबा?

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण हिमालयात असलेल्या अदृष्य योगी महाराजांसोबत सल्लामसलत करुन निर्णय घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. हिमालयात असलेल्या अदृष्य योगी महाराजांसोबत सल्लामसलत करुन त्या निर्णय घेत असत. याच बाबांच्या सल्ल्याने त्यांन आनंद सुब्रमण्यम यांना एनएसईत सल्लागार म्हणून नियुक्त केले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली. हिमालयाचा योगी बाबा कोण आहे, हे अद्याप उघड झाले नसले तरी फक्त बाबांचा ईमेल आयडी rigyajursama@outlook.com सापडला. योगी परमहंस असल्याचे चित्रा रामकृष्ण यांनी सेबीला चौकशीदरम्यान सांगितले. ते हिमालयाच्या रांगेत कुठेतरी राहतात असेही त्या म्हणाल्या होत्या.

कशी झाली चित्रा रामकृष्ण आणि योगी बाबाची भेट

वीस वर्षांपूर्वी गंगेच्या तीरावर एका यात्रेदरम्यान चित्रा आणि बाबाची भेट झाली होती. चित्रा त्या निराधार बाबाला ईमेलद्वारे विचारायची की कोणत्या कर्मचाऱ्याला किती रेटिंग द्यायचे आणि कोणाला प्रमोशन द्यायचे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची सर्व महत्त्वाची माहिती बाबांसोबत शेअर केली. मंडळाच्या बैठकीचा अजेंडाही बाबांना दिला होता. चित्राच्या म्हणण्यानुसार, योगी त्यांना पाहिजे तिथे दिसू शकत होते असा दावा त्यांनी केला होता.

ई-मेलवरून अजब-गजब संवाद…

रामकृष्णा बाबाच्या इशाऱ्यावरूनच एक्स्चेंजची सर्व गोपनीय माहिती ई-मेलद्वारे या बाबाकडे पाठवित होत्या. याच बाबाच्या सल्ल्यावरूनच वार्षिक 15 लाखांचे पॅकेज असलेल्या मॅनेजर आनंद सुब्रह्मण्यम यांना 1.38 कोटी वार्षिक पॅकेजवर नियुक्ती दिली. त्यामुळेच प्रश्नचिन्हही उपस्थित झाले आहेत. शेवटी हिमालयात राहणारा हा बाबा आहे तरी कोण ज्याच्या इशाऱ्यावरून हा सर्व खेळ सुरू होता? सुब्रह्मण्यम कोण ज्यास कोट्यवधींचे पॅकेज देण्यात आले? सेबीला याचा शोध लागला कसा? आणि जेव्हा लागला तेव्हा सेबीने कोणती कारवाई केली ही सर्व प्रश्ने अनुत्तरीत आहेत.ज्या ईमेल आयडीवरून चित्रा बाबाला विचारणा करीत असत ती ईमेल आयडी मात्र तपास यंत्रणआंना प्राप्त झाली आहे. या ईमेल आयडीवरून कोणत्या कर्मचाऱ्यास किती रेटिंग द्यायचे व कोणाला पदोन्नती द्यायची हे त्या विचारत असत.

कोण आहेत चित्रा?

चित्रा रामकृष्ण चार्टर्ड अकाउंटंट आहेत. 2013 मध्ये त्या एनएसईच्या पहिल्या महिला एमडी आणि सीईओ झाल्या होत्या. 2016 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. सेबीने केलेल्या चौकशीत त्यांनी हिमालयातील एका बाबाच्या सल्ल्यावरूनच काम करीत होते, अशी कबुली दिली होती.

अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.