अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून तब्बल 5 तास कसून चौकशी

ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचा मुलगा अमित याची आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास चौकशी केली.

अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून तब्बल 5 तास कसून चौकशी
अविनाश भोसले
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 10:52 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचा मुलगा अमित याची आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. (ED interrogates Avinash Bhosale son Amit for 5 hours)

ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अविनाश भोसले, अमित भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टाने अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना चौकशीला समोरे जाण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले, अमित भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे. अविनाश भोसले यांना यांना 1 जुलै रोजी तर अमित यांना आज 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. त्यानुसार अमित भोसले आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची आज पाच तास कसून चौकशी झाली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

40 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

भोसले यांची ईडीविरोधात याचिका

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.

या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

संबंधित बातम्या

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

(ED interrogates Avinash Bhosale son Amit for 5 hours)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.