बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरी ईडीचं पथक दाखल, जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात

गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेला अनिल जयसिंघानी याच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं असून, ईडीकडून घराची झडती सुरु आहे.

बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरी ईडीचं पथक दाखल, जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात
अनिल जयसिंघानीच्या घरी ईडीचा छापाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 4:06 PM

निनाद करमरकर, TV9 मराठी, उल्हासनगर : बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं असून, ईडीकडून घराची झाडाझडती सुरु आहे. अनिल जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात आहे. या छापेमारीत काय घबाड हाती लागंतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिलची मुलगी अनिक्षा हिला अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरु असून, या पार्श्वभूमीवर ईडीने आजचा छापा टाकला आहे.

अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याने अनिक्षा जयसिंघानी रडारवर

अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिची जामीनावर सुटका झाली असली, तरी तिचे वडील अनिल जयसिंघानी हे अजूनही गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहेत. यानंतर ईडीकडूनही या लाच प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आज ईडीचं पथक अनिल जयसिंघानी याच्या घरी तपासासाठी दाखल झालं आहे. पथकातील 8 ते 10 अधिकारी जयसिंघानी याच्या घरी तपास करत आहेत.

अमृता फडणवीस यांना एक कोटीची ऑफर दिली

अनिक्षा जयसिंघानी हिने इंग्रजी विषयातून एम.ए. केले. यानंतर सध्या हरिश स्कूल ऑफ लॉ मधून वकिलीचं शिक्षण घेतेय. अनिक्षा हिची 2015-16 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 2021 मध्ये डिझायनर बनून अनिक्षाने अमृता यांच्याशी जवळीक साधली. जवळीक वाढल्यानंतर आपले वडील अनिल जयसिंघानी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्य करण्यासाठी मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपये अमृता यांना देऊ केले. सहकार्य न केल्यास धमकीच सत्र सुरू केलं होतं

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.