Anil Parab : ‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’, ईडी छापेमारीनंतर सोमय्यांनी परबांना सुनावलं
ईडीची सध्याची कारवाई अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोलीमध्ये 1 कोटी रुपयांच्या मोबदल्यात जमीन खरेदी केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. परंतु ती 2019 मध्ये नोंदवण्यात आली. इतर काही आरोपांचीही चौकशी केली जात आहे.
मुंबई – अनिल परब (Anil Parab) यांच्यावरती ईडीने (ED) छापेमारी करायला सुरूवात केल्यानंतर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिका यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता अनिल परब यांनी आपला बोजा बिस्तरा भरावा असा सल्ला किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना दिला आहे. त्यामुळे अनिल परब यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय संबंधित व्यक्तीविरुद्ध ईडीने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीला सबळ पुरावे मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. ईडीच्या या छाप्यात कोणते नवे पुरावे समोर येतात हे पाहावे लागेल असंही किरीट सोमय्यांनी सांगितले.
Mumbai | Enforcement Directorate conducts raid at a location of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab in Mumbai
हे सुद्धा वाचाED raids are underway at seven locations in Pune and Mumbai pic.twitter.com/WOFa8fGO88
— ANI (@ANI) May 26, 2022
सात ठिकाणी ईडीचे छापे
आज ईडीने महाराष्ट्राचे शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबईसह राज्यातील सात ठिकाणी छापे टाकले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि दापोली येथे हे छापे टाकण्यात आले आहेत. परब यांच्या पुणे, मुंबई आणि दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या अनिल परब यांच्यावरती आरोप करीत होते. तसेच त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रला कळेल असंही ते म्हटले होते.
अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप
ईडीची सध्याची कारवाई अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोलीमध्ये 1 कोटी रुपयांच्या मोबदल्यात जमीन खरेदी केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. परंतु ती 2019 मध्ये नोंदवण्यात आली. इतर काही आरोपांचीही चौकशी केली जात आहे.
2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांना विकली गेली, असा आरोप आहे. दरम्यान, 2017 ते 2020 या कालावधीत या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आले.