Viva Group : विवा ग्रुपच्या कारभाराचं रहस्य भंगारातील लॅपटॉपमध्ये, ED कडून भंगारवाल्याचा शोध
विवा ग्रुपचे सीए मदन चतुर्वेदी यांनी कंपनीचा सर्व डेटा ज्या लॅपटॉपमध्ये होता तो लॅपटॉप अवघ्या 300 रुपयात भंगारात विकल्याची कबुली ईडीसमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी (22 जानेवारी) ईडीने आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नातेवाईकांच्या विवा ग्रुपवर (Viva Group) छापे टाकले होते. या कारवाईनंतर ईडीने मेहूल ठाकूर आणि मदन गोपाल चतुर्वेदी या दोघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. मदन चतुर्वेदीनं चौकशीमध्ये त्याचा एक लॅपटॉप भंगारामध्ये 300 रुपयांना विकल्याचं कबूल केलं आहे. त्या लॅपटॉपमध्ये विवा ग्रुपच्या काराभाराचा डाटा असल्याची माहिती मदन चतुर्वेदीनं ईडीसमोर दिली आहे. ईडी सध्या वसई विरारमधील भंगारवाल्यांची चौकशी करत आहे. (ED starting enquiry of scrappers of Vasai Virar for laptop of Madan Chaturvedi for data of Viva Group)
ईडीकडून लॅपटॉपचा शोध, भंगारवाल्यांची चौकशी
ईडीनं पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी प्रकरणी शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वसई विरारमध्ये विवा ग्रुपच्या चार पाच कार्यालयांवर छापे टाकले होते. ईडीनं मेहूल ठाकूर आणि मदन चतुर्वेदी यांना अटक केली होती. त्यांनंतर ईडीकडून दोघांची कसून चौकशी करण्यात आली होती. विवा ग्रुपचे सीए मदन चतुर्वेदी यांनी कंपनीचा सर्व डेटा ज्या लॅपटॉपमध्ये होता तो लॅपटॉप अवघ्या 300 रुपयात भंगारात विकल्याची कबुली ईडीसमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ईडीची टीम सध्या वसई विरारमध्ये अनेक भंगरवाल्यांची चौकशी करून या लॅपटॉपचा शोध घेत आहे.
ईडीनं शुक्रवार (22 जानेवारीला) विवा गृपवर झालेल्या छापे टाकले होते. चौकशीनंतर सीए मदन चतुर्वेदी आणि व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. मेहुल ठाकूर आणि मदन चतुर्वेदी यांनी त्यांचे मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट केले असून या लॅपटॉपमध्ये बरीच महत्वाची माहिती आहे त्यामुळे ईडीकडून या लॅपटॉपचा शोध घेतला जातोय.\
ईडीच्या कारवाईवर हितेंद्र ठाकूरांची प्रतिक्रिया
“ईडी काय चौकशी करत आहे माहिती नाही. ते जी काही चौकशी करायची ते करतील. त्यांना जी तपासणी करायची आहे ते तपासतील. ईडी आमच्या स्टेशनवरील घरी आणि ऑफिसला चौकशी करत आहे. आमचं नाव कशातही येऊ द्या, जे काही चेकचे व्यवहार आहेत त्याचं स्पष्टीकरण आम्ही ईडीला देऊ. ईडीचा ससेमिरा माझ्यामागे लागावा इतका मोठा नेता मी नाही. पण या चौकशीमुळे आज वृत्तवाहिन्यांवर मी दिसतोय, उद्या वर्तमानपत्रालाही नाव येईल. त्यामुळे मला मोठं होण्याची संधी मिळालीय,” असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.
‘आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर दोघेही विवा ग्रुपचा भाग नाही’
विवा ग्रुपमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर हे दोघेही नाहीत. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि आणि इतर परिवार विवा ग्रुपचं काम पाहतात.
Signal App मध्ये 8 नवे बदल, WhatsApp ला टक्कर देण्यासाठी लवकर अपडेटेड व्हर्जनhttps://t.co/03KPPXtKX0#SignalApp | #Signal | #WhatsApp | #WhatsAppPrivacyPolicy
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या:
ईडी चौकशीमुळे आता मी देखील मोठा झालोय : आमदार हितेंद्र ठाकूर
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?
(ED starting enquiry of scrappers of Vasai Virar for laptop of Madan Chaturvedi for data of Viva Group)