इचलकरंजीः इचलकरंजी शहरातील (Ichalkaranji) लिंबू चौक परिसरातील राहणाऱ्या एका यंत्रमाग धारकाने महावितरणची वीज चोरी (Power theft) केल्याप्रकरणी सलमान चिंचले यांना नोटीस बजावली आहे. 97 लाख 22 हजार 26 रुपयांची वीज चोरली केली असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने आठ दिवसांपूर्वी ही चोरी पकडली होती. यामध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आज महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांनी सलमान चिंचले यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे भरावे अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश बजावले आहेत.
इचलकरंजी शहरामध्ये एका यंत्रमाग धारकाने वीज चोरल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. भरारी पथकाने छापा टाकून ही चोरी पकडली असून आज महावितरणचे अधिकाऱ्यांनी चिंचले यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसामध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत, त्यामुळे वारंवार जर इचलकरंजीमध्ये असे प्रकार होत असतील तर महावितरणकडून धाड टाकण्याची मोहीम राबवणारी असल्याचेही चर्चा आहे.
इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग आहेत. त्यामुळे विजेचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. त्यामुळे वीज मोठ्या प्रमाणात लागत असल्याने अनेकदा वीज चोरी होत असते. त्यामुळे हे प्रकार अनेकदा उघडही झाले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असेल तर संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी विभागात विजेची मागणी मोठी आहे. महावितरणला पॉवरलूमसह औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची सविस्तर माहिती ऑनलाईन मिळते. त्यामुळे माहितीच्या आधारे गळती असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून वीज चोरी उघडकीस आणली आहे.