Eknath Khadse : खडसेंच्या अडचणीत वाढ! जप्त केलेली मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करा, ईडीची नोटीस

Eknath Khadse ED : दहा दिवसांत या मालमत्ता खाली केल्या नाहीत, तर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येईल, असं खडसेंना नोटीशीतून बजावण्यात आलंय.

Eknath Khadse : खडसेंच्या अडचणीत वाढ! जप्त केलेली मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करा, ईडीची नोटीस
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 7:44 AM

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (BJP vs NCP) प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंना ईडीनं नोटीस (Eknath Khadse ED Notice) पाठवली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता रिकामी करण्याबाबत निर्देश देणारी नोटीस ईटीकडून खडसेंना पाठवण्यात आलीय. येत्या दहा दिवसांत जप्त केलेली मालमत्ता रिकामी करा, असे निर्देश खडसेंना नोटीसीसून देण्यात आलेत. तसं न केल्यास खडसेंच्या जप्त केलेल्या मालमत्तांवर कायदेशीर कारवाई करत त्या मालमत्ता खाली केल्या जातील, असा इशारा नोटिशीतून देण्यात आलेलाय. जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंच्या काही मालमत्ता ईडीनं जप्त केल्या होत्या. या मालमत्तांबाबत नोटीस पाठवण्यात आलीय. दरम्यान, खडसेंसोबत अन्य चौघांना ईडीनं याबाबतची नोटीस धाडलीय.

नेमकं प्रकरण काय?

जमीन घोटाळा प्रकरणी ईडीनं खडसेंवर कारवाई केली होती. 2021 साली ही कारवाई करण्यात आलेली. ऑगस्ट 2021 मध्ये ईडीकडून खडसेंची 5.75 कोटी रुपये किंमतीचा मालमत्ता जप्त केली होती. जप्त केलेल्या मालमत्ता खाली करण्याच्या अनुशंगाने आता एकनाथ खडसेंना नोटीस पाठवण्यात आली आहे.

यात खडसेंना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दहा दिवसांत या मालमत्ता खाली केल्या नाहीत, तर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येईल, असं खडसेंना नोटीशीतून बजावण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

कोणकोणत्या मालमत्ता?

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये लोणावळ्यातील एक बंगला, जळगावमधील 3 फ्लॅट्स आणि 3 मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता रिकामी करण्यासोबत, या संबंधित मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरीत करण्याची परवानगी न देण्याबाबतही नोंदणी महानिरीक्षकांना कळवण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ :

भाजप सरकारमध्ये मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भूखंड बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. महसूल मंत्री असतेवेळी एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील 3.1 एकर एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.