अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनविला, त्यानंतर केलं ज्युनिअरचं शोषण
आरोपींनी त्याला तीन ऑप्शन दिले होते. त्यानं आपला प्रायव्हेट पार्ट कापावा.
राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये रॅगिंगचा अमानवीय प्रकार समोर आला. येथील एका खासगी विद्यापिठातील विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडीओ बनविण्यात आला. त्यानंतर पाच विद्यार्थ्यांनी त्याला ब्लॅकमेल केले. पीडित विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांनी त्याचं अनैसर्गिक शोषण केले. एवढचं नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, शहद, टूथब्रश आणि पेन्सिलही टाकली. तसेच त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याची धमकी दिली.
आरोपी पाच विद्यार्थ्यांपैकी एक अल्पवयीन आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलंय.
गेल्या गुरुवारी पीडिताच्या वडिलांनी राजकोटच्या कुवाडवा रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानं मोठ्या बहिणीला होस्टेलमध्ये राहणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी तो फोनवर रडतही होता. बहिणीनं या घटनेची माहिती वडिलांना दिली. बहीण आणि वडील लगेच होस्टेलमध्ये गेले.
पीडित विद्यार्थ्यानं रडत रडत आपबिती त्यांना सांगितली. हे ऐकूण कुटुंबीय हादरले. पीडित विद्यार्थ्यानं सांगितलं की, तो अंघोळ करत असताना त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला. त्यानंतर त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
आरोपींनी त्याला तीन ऑप्शन दिले होते. त्यानं आपला प्रायव्हेट पार्ट कापावा. दुसरा त्यानं आपला कान कापावा. किंवा तिसरा होस्टेलच्या छतावरून उडी मारावी. यापैकी काहीही न केल्यास त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं वागविलं जाईल.
त्या दिवसानंतर पीडिताशी अनैसर्गिक संबंध ठेवण्यात आले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर, शहद आणि पावडर लावण्यात आले. तसेच प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल तसेच टूथब्रश टाकण्यात आल्याचं पीडित विद्यार्थ्यानं सांगितलं.