HSC Paper Leak : पेपर फुटी प्रकरणात खाजगी शिक्षकांचं मोठं जाळं असण्याची शक्यता : सूत्र
मुळाशी जाऊन तपास करा, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. पेपर फुटी प्रकरणात खाजगी शिक्षकांच मोठं जाळं असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुंबई : स्पर्धा परिक्षांच्या पेपर फुटीनंतर आता बारावीच्या पेपर फुटीचे पेव फुटले आहे. बारावीचा केमिस्ट्री आणि गणित विषयाचा पेपर फुटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पेपर फुटी (Paper Leak)मागे खाजगी क्लास (Private Class) चालकांचं रॅकेट असण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. आधी केमिस्ट्रीचा पेपर फुटला, मग गणिताचाही पेपर फुटला. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. यामुळे खाजगी क्लास चालकांचे धाबे दणाणले आहेत. केमिस्ट्री पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमध्ये एका खाजगी क्लासच्या प्रोफेसरला अटकही करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वीच केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर लिक झाल्याचे उघड झाले होते. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. (Expressed the possibility of a network of private class owner in the case of paper leak)
केमिस्ट्री पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खाजगी प्रोफेसरला अटक
केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खाजगी क्लासचालक मुकेश धनसिंग यादव याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. तसेच याप्रकरणी तीन विद्यार्थिनींचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये अन्य काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिस तयारीत आहेत. मालाडमध्ये राहणारी एका विद्यार्थिनीला विलेपार्ले येथील साठे कॉलेजमध्ये बारावीचे सेंटर आले होते. शनिवारी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र पेपर सुरु झाला तरी विद्यार्थिनी वर्गात आली नव्हती. हा प्रकार वर्गातील सुपरवायझरच्या लक्षात आला. त्यानंतर काही वेळाने शौचालयातून आवाज येत असल्याने सुपरवायझरने जाऊन पाहिले असता सदर विद्यार्थिनी तेथून बाहेर येताना दिसली. सुपरवायझरने विद्यार्थिनीकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सुपरवायझरला संशय आला. त्यांनी विद्यार्थिनीचा मोबाईल ताब्यात घेत तपासला असता सदर प्रकार उघडकीस आला.
अहमदनगरच्या श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला
अहमदनगरला श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला. बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, सकाळी 10 वाजताच उत्तरपत्रिकेसह पेपर सोशल मीडियावर बघितल्यानंतर आर्श्चय व्यक्त केले जात आहे. मात्र, ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली किंवा नाही याबाबत पोलीस तपासानंतरच खुलासा करण्यात येणार आहे. तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Expressed the possibility of a network of private class owner in the case of paper leak)
इतर बातम्या
Sangli Crime : सांगलीत वाळू तस्करांची मुजोरी, चक्क महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी
Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण